तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा...

गणरायाच्या आगमनासाठी नाशिक सज्ज
गणपती
गणपती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांच्या (Ganpati Bappa) आगमनाचा दिवस. पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही कायम आहे. आजपासून दहा दिवस गणरायाचे घरोघऱी भक्तीभावाने पूजन केले जाणार आहे...

घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होणार आहे. यंदाही गणेशोत्सवावर करोनाच्या तिसर्‍या लाटेचे (Corona Third Wave) सावट आहेच. ते बघता सरकारने लावून दिलेल्या काही नियमात बाप्पाचे आगमन होत आहे.

काही मंडळांनी गणेश जयंतीला गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीही पूर्ण झाली आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी चित्रा नक्षत्र आहे.

गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी 12 वाजून 18 मिनिटे, भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी 9 वाजून 57 मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त : सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते 13 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे.

गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे पुजा साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपार्‍या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपार्‍या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ यांची सर्वत्र रेलचेल आहे.

विशेष म्हणजे या वस्तूंचे दरदेखील आवाक्यात आहे. सर्वांचा लाडका देवता घरोघरी येत असल्याने भावीकदेखील वस्तूंच्या दरांचा विचार करतांना फारसे दिसत नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com