सीमोल्लंघनासाठी नाशिककर सज्ज

सीमोल्लंघनासाठी नाशिककर सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला, नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता करणारा, शस्रपूजन, रा. स्व. संघाचे शानदार संंचालन, सायंकाळी सीम्मोलंघन, रावण दहन, दिवसभर धममचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. त्यासाठी सराफ बाजारासह झेंडु फुलांची बाजरपेठ चांगलीच सजली आहे.

पंचांगानुसार 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी दशमी सुरू झाली. 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता दशमी तिथी संपणार आहे. दसर्‍याचा विजय मुहूर्त दोन वाजून सात मिनिटांपासून दोन वाजून 54 मिनिटांपर्यंत असेल. तसेच दुपारचा शुभमुहूर्त एक वाजून 20 मिनिटांपासून ते तीन वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. या वर्षी दसर्‍याला तीन महत्त्वाचे शुभ योग सुकर्मा, धृती आणि रवी योग जुळून येत आहेत. त्यामुळे या वर्षीचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण आहे.3

संघाचे 21 ठिकाणी संंचलन

‘विजयादशमी’ हा सज्जनशक्तीच्या विजयाचा दिवस असल्याने व करोना काळातील बंधनांनंतर यावर्षी प्रथमच उत्साहात उत्सव साजरा करू शकत असल्याने यंदाच्या संचलनाला मोठा उत्साह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी पथ संचलन बुधवारी शहरात 21 ठिकाणी आहे. गुरुगोविंदसिंग नगर - सकाळी 7 वा. - गामणे मळा मैदान, खुटवडनगर - सकाळी 8.45 वाजता - श्रीवरद गणपती मंदिर मैदान, खुंटवडनगर पोलीस चौकी समोर, समारोप स्थान :- ठाणे जनता बँकेजवळ, डी.जी.पी.नगर न.2 समोर, रविवार कारंजा नगर संचलन - सकाळी 7 वाजता - बी. डी. भालेकर हायस्कूल येथील लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळून सुरु पुन्हा येथेच समाप्त. पंचवटी नगर - सकाळी 7 वा. - साई मंदिर मधुबन कॉलनी - मालेगाव स्टॅण्ड - चिंचबन - हनुमानवाडी रोड - जाधव कॉलनी - राजपाल कॉलनी - मधुबन कॉलनी - साई मंदिर मधुबन कॉलनी छत्रपती शिवाजीमहाराज चौक (कथडा ) जुने नाशिक - सकाळी 8 वाजता माणेक शॉ नगर - सकाळी 9 वा.- प्रमुख अतिथी मनोज पिंगळे - संचलन मार्ग - रंगुबाई जुन्नरे विद्यालय येथून सुरू होऊन रविंद्र विद्यालय चौक - टाकळी रोडपासून उजवीकडे - शंकर नगर - संगम स्वीट चौकातून उजवीकडे तपोवन रोड ने अनुसुया नगर चौकातून उजवीकडे जैन स्थानक गणेशनगरहून डावीकडे सावता माळी उद्यान. तेथून डावीकडे काठे नगर जवळून उजवीकडे सुनंदा हाईट मार्गे पुढे उजवीकडे वळून रॉयल मेडिकल ला वळसा घालून डावीकडे बनकर चौक. महात्मा फुलेनगर - विट्ठल रुक्मणी मंदिर, ओमकार नगर, मखमलाबाद - सायंकाळी 4 .30 वाजता - नाना नानी पार्क येथून प्रस्थान सातपूर संचलन - सकाळी 8 वा. - जाणता राजा मैदान अशोक नगर - मुक्तिधाम - सकाळी 7.30 वाजता - पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम स्कूल, नवीन नाशिक येथे विजय प्रायमरी स्कूल मैदान, पवननगर येथे सकाळी 7.ला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com