नाशिक | प्रतिनिधी

बांधकाम व्यवसायिकांची देशातील शिखर संस्था क्रेडाईच्या राष्ट्रीय चेअरमन पदी पुण्याचे सतीश मगर यांची निवड झाली असून, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे...

क्रेडाईच्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची निवड नुकतीच जाहर करण्यात आली.हि निवड वर्ष 2021-23 या कालावधीसाठी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात हि घोषणा करण्यात आली.

राष्ट्रीय कार्यकारीणीत नाशिकचा वरचस्व दिसून आले. क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाई च्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून नवड करण्यात आली. तर गौरव ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाई च्या श्वेत पत्रिका समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

क्रेडाई नाशिक मेट्रो व क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी क्रेडाई संस्थेसाठी भरीव कार्य केले असून संघटना वाढीसाठी राज्यभरात क्रेडाईचे अनेक चॅप्टर सुरु केले आहेत.

बांधकाम क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरुन काम करताना ते निश्चितच आपला वेगळा ठसा सोडतील असा सूर नाशिक बांधकाम क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.