नाशिकच्या सुवर्णा कोठावदेंनी गाजवली राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा

देशातील पहिल्या तीन सौंदर्यवतींमध्ये येण्याचा पटकावला बहुमान
नाशिकच्या सुवर्णा कोठावदेंनी गाजवली राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सौंदर्य, बुध्दीमत्ता आणि समयसूचकता यांचा मेळ साधत विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये नाशिकचा लौकिक प्रतिबिंबित करण्याची परंपरा येथील सुवर्णा कोठावदे (Suvarna Kothavade) यांनी यशस्वीपणे राखली. आत्मविश्‍वासाच्या बळावर स्वत:ला सिध्द करत कोठावदे यांनी राष्ट्रीय पातळीवरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पहिल्या तीन सौंदर्यवतींमध्ये येण्याचा बहुमान पटकावला....(National beauty contest)

नाशिकच्या सुवर्णा कोठावदेंनी गाजवली राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा
“राज्यात रुग्णसंख्या वाढतेय, दोन दिवसांत...”; राजेश टोपे यांचे मोठे विधान

मुंबईमध्ये मुंबई ग्लोबल एडिशनद्वारा (Mumbai Global Edition) आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेचे एका अलिशान हॉटेलमध्ये आयोजन करण्यात

या स्पर्धेचे परिक्षण चित्रपट अभिनेत्री आरती नागपाल (Arti Nagpal), डॉ. पारुल सोमाणी (Dr Parul Somani), फिल्म डायरेक्टर & प्रोडूसर डॉ. अजय सहाय (Dr Ajay Sahay), आदींनी केले. .

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह देशातील अरूणाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, राजस्थान, उत्तराखंड व सिक्कीम आदी विविध राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

नाशिकच्या सुवर्णा कोठावदेंनी गाजवली राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा
सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती करोनाबाधित

स्पर्धक महिलांनी आपापल्या सौंदर्य आणि बुध्दीमत्तेचे यथोचित प्रदर्शन घडवत परीक्षकांच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

पण या स्पर्धेमध्ये उत्तर महाराष्ट्रातून केवळ कोठावदे यांची निवड करण्यात आली होती. कोठावदे यांनी परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची आपल्या बुद्धिमततेच्या जोरावर समाधानकारक उत्तरे देत या स्पर्धेमध्ये पहिल्या तीन विजेत्यांमध्ये मध्ये येण्याचा बहुमान मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com