‘आयर्नमॅन’ साठी नाशिककर सज्ज

ट्रायथलॉन स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद
‘आयर्नमॅन’ साठी नाशिककर सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पुढील महिन्यात नाशिकचे अनेक खेळाडू विविध आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेकडे ( International Ironman Competition) कूच करणार आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. मुस्तफा टोपीवाला, डॉ. पिंपरीकर स्पोर्ट्समेड टीमतर्फे ट्रायथलॉन स्पर्धा पिंपळगाव बसवंत येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिकमधील सुमारे 25हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.

ट्रायथलॉन स्पर्धा (Triathlon competition)ही आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेणार्‍या खेळाडूंच्या सरावासाठी आयोजित करण्यात आली होती. कडवा नदीवर 3 किमी पोहणे, त्यानंतर 110 किमी सायकल आणि 30 किमी धावणे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

स्पर्धेत महिला खेळाडूंसह 17 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मविप्रचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अरुण गचाळे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुलतान देशमुख यांच्या टीमने या स्पर्धेत सहकार्य केले.

खेळाडूंनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धेमुळे खेळाडूंना खूप काही शिकायला मिळाले. आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणार्‍यांना ट्रायथलॉनमुळे मोठा फायदा होणार आहे. भविष्यात अशा आणखी स्पर्धा आयोजित करण्याची आमची योजना जेणेकरून मोठ्या स्पर्धांसाठी खेळाडू तयारी करू शकतील.

- डॉ. मुस्तफा टोपीवाला, फिजिओथेरपिस्ट.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com