नाशिकच्या ईश्वरीचे सलग दुसरे धडाकेबाज अर्धशतक

नाशिकच्या ईश्वरीचे सलग दुसरे धडाकेबाज अर्धशतक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

१९ वर्षांखालील राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra cricket team) संघातर्फे खेळताना नाशिकच्या  ईश्वरी सावकारने (Ishwari Savkar) चंदिगड विरूद्ध धडाकेबाज अर्धशतक ठोकले...

नाशिकच्या ईश्वरीचे सलग दुसरे धडाकेबाज अर्धशतक
या हॅकरमुळे बंद पडले WhatsApp, Facebook अन् Instagram

सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी ने ७९ चेंडूत ७३ धावांची महत्वपूर्ण फलंदाजी केली. त्या जोरावर महाराष्ट्राने चंदिगडवर ६ गडी राखून विजय मिळविला. ईश्वरीचे हे दोन सामन्यातील दुसरे अर्धशतक असल्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

नाशिकच्या ईश्वरीचे सलग दुसरे धडाकेबाज अर्धशतक
कालिका दर्शनासाठी टोकन कायम; शुल्काचा निर्णय मागे

तिने याआधीच्याच सामन्यात आंध्र (Andrapradesh) विरूद्ध खेळताना महत्वपूर्ण ८६ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), बीसीसीआयतर्फे 19 वर्षांखालील महिलांसाठी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2021 दरम्यान सुरत (Surat) येथे खेळविली गेली.

नाशिकच्या ईश्वरीचे सलग दुसरे धडाकेबाज अर्धशतक
शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जायचंय, मग ‘हे’ नियम वाचा

प्रथम फलंदाजी केलेल्या चंदिगड (Chandigad) संघाला महाराष्ट्राने (Maharashtra) ४५ षटकांत १७७ वर रोखले. नाशिकच्या रसिका शिंदे (Nashik Rasika shinde) ने उत्तम गोलंदाजी करताना ५ षटकांत १४ धावा देत १ गडी बाद केला. महाराष्ट्रातर्फे फलंदाजीत नाशिकच्याच साक्षी कानडी ने ईश्वरी ला साथ देताना १३ धावा केल्या . अशा रीतीने नाशिकच्या तिन्ही महिला क्रिकेट पटूनी संघाच्या मोठ्या विजयात खारीचा वाटा उचलला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com