Video : लसीकरणासाठी उसळली गर्दी; सामाजिक अंतराचा फज्जा

Video : लसीकरणासाठी उसळली गर्दी; सामाजिक अंतराचा फज्जा

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशकात गेल्या चार दिवसापासून बंद असलेली लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) आज पुन्हा सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या (Covid 3rd stage) पार्श्वभूमीवर सर्वांचे लसीकरण (Vaccination) झाले पाहिजे असे प्रयत्न प्रशासन करत असल्यामुळे मोठा लसींचा साठा नाशिकला काल प्राप्त झाला. यानंतर आज नाशिक शहरासह जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक लसीकरण (Record break Vaccination) होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच अचानक नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर अतोनात गर्दी केल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रात लसी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.....

नवीन नाशकात आज लस घेण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टंसिंगचा (Social Distance not follow at vaccination center) फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. सध्या दिवसेंदिवस करोना बाधितांची रुग्ण संख्या वाढायला सुरुवात झाली असताना नागरिकांनी लसीकरणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने करोणाचा धोका नाकारता येत नसल्याचे जाणकारांनी सांगितले.

दुसरीकडे, पंचवटी परिसरात लसीकरण (Panchvati area vaccination) आजपासून सुरु होणार असल्याच्या माहितीमुळे पहाटेपासून नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. अचानक केंद्रावरील कर्मचारी याठिकाणी दाखल झाले, त्यांच्याकडून आज लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने हिरमोड झाला. त्यानंतर याठिकाणची गर्दी ओसरली होती.

शहरातील मुख्य लसीकरण केंद्रांवर मात्र, सकाळपासून गर्दीचा महापूर असून सर्वच केंद्रांवर नाशिककर लस टोचून घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. आज विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे अनेक अस्थापना बंद आहेत, औद्योगिक वसाहत बंद असते. परिणामी मोठी गर्दी लसीकरण केंद्रांवर झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com