नाशिकचे अधिकारी बनले बूस्टर डोसचे 'ब्रँड अम्बेसिडर'

नाशिकचे अधिकारी बनले बूस्टर डोसचे 'ब्रँड अम्बेसिडर'

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील फ्रन्टलाइन अधिकारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,  जिल्हाधिकारी  सुरज मांढरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  लीना बनसोड नाशिक महानगरपालिका आयुक्त  कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी  कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेत सबंध नाशिककरांना त्यांनी बुस्टर डोस घेण्यासाठी प्रोत्साहित केले....

सर्व विभाग एकत्रित येऊन कोविड-१९ साथ रोगाविरुद्ध एकत्रित लढत आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण करून आम्ही सज्ज आहोत, हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले. आज सोमवारी (दि.१०) जिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात सर्वांनी सकाळी उपस्थित राहून सर्वांनी बूस्टर डोस घेतला.

याप्रसंगी आरोग्य विभागाचे विभागीय उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक डॉ. पु.ना.गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.आर. श्रीवास, डॉ.शरद पाटील, डॉ.मनोज गाडेकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी कोणती लस आपण घेणार आहोत याबद्दल माहिती घेतली.

यापूर्वी त्यांनी जी लस घेतली होती त्याच लसीचा बूस्टर डोस आज त्यांना देण्यात आला. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन सेवक यांनी बूस्टर डोसचा लाभ घ्यावा, तसेच 60 वर्षावरील व्यक्तींनी सुद्धा या मोहिमेचा लाभ घ्यावा व आपला जिल्ह्याचे शंभर टक्के लसीकरण होईल यासाठी सर्वांनी आग्रहाने प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

लसीकरण सत्राचे आयोजन बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व आरोग्य सेवक व फ्रन्टलाइन वर्कर यांनी आपले बूस्टर डोसचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन याप्रसंगी केले. लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरज हरगुडे, जिल्हा रुग्णालयाचे सेवक यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.