बाबासाहेबांनंतर नाशिकचा हा युवक त्याच विद्यापीठातून झाला 'बॅरिस्टर'

बाबासाहेबांनंतर नाशिकचा हा युवक त्याच विद्यापीठातून झाला 'बॅरिस्टर'

नाशिक | प्रतिनिधी

भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर लंडनमधील ग्रेसइन या लॉ कॉलेजमधून बॅरिस्टर झाले होते. तब्बल ९९ वर्षानंतर नाशिकच्या संवेदन अपरांती यांनी याच महाविद्यालयातून बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. नाशिकच्या सुपुत्राने हा बहुमान मिळवल्यामुळे अपरांती यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा शोधत २०१७ साली संवेदन अपरांती यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रचंड अभ्यास, यशस्वी होण्याची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आज त्यांनी या यशाला गवसणी घातली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com