नाशिककर दररोज करतात तब्बल 'इतके' पाव फस्त

नाशिककर दररोज करतात तब्बल 'इतके' पाव फस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दररोज नाशिकर (nashikkar) सकाळच्या चहा (tea) पाव (bread) पासुन ते रात्री च्या अंडाभुर्जी पर्यंंत तब्बल पाच लाख पाव फस्त करत असल्याचे आढळुन आले आहे. आता गुरुवार पासुन त्यांना प्रत्येक पावा मागे 50 पैसे् जादा मोजावे लागणार आहेत.

नाशिक शहरामध्ये (nashik city) येत्या गुरुवार दहा नोव्हेंंबर पासून बेकरी उत्पादक संघटनेने (Bakery Manufacturers Association) घाऊक दरात 30 ट्क्के भाव वाढीचा (Price increase) निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक पावामागे 50 पैसे भाव वाढला आहे. अडीच रुपयांपासुन ते पाच रुपयांंपर्यंत पाव घाऊक दरातच मिळणार आहे.

नाशिक शहर बेकरी मालक संघटनेच्या (Bakery Owners Association) वतीने पत्रकार परिषदेत राहुल शिंदे, मोबीन खान, ललित मानकर, निलेश सोसे, फैयाज खान, नसीम खान, जुबेर सय्यद, नफिस खान, दीपक काळे यांनी ही भाववाढीची (Price increase) माहीती दिली.

पाव तयार करण्यासाठी मैदा, तेल, जळणासाठी लाकूड आणि महत्वाचे म्हणजे मजुरी याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पावाच्या दरातही वाढ करावी लागली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पावाचा आकार आणि वजन या तुलनेमध्ये वेगवेगळे प्रकार असल्यामुळे आता सर्वसाधारण एक पावाच्या पाठीमागे 50 पैसे ते एक रुपया असे दर वाढले जाणार आहेत. पाव वगळता इतर कोणत्याही बेकरी उत्पादक पदार्थांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही .

नाशिक शहरात असलेल्या 40 बेकरी उत्पादकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये (nashik district) सर्वसाधारण चार ते पाच लाख पावाची विक्री केली जाते असे सांगीतले. दररोज सर्वसाधारण 40 ते 50 कट्टे मैदा विविध बेकरी उत्पादकांना लागतो. एक कट्टा 50 किलोचा असतो. मैद्याचे दर वाढल्याने ही वाढ झाली आहे. यापूर्वी 2020 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. त्यनंतरची ही दुसरी वाढ आहे.

त्यामुळे पाववडे, पाव भाजी (Pav bhaji), मिसळपाव, चहा पाव, अंडा भुर्जी या सवार्ंवर त्याचा परीणाम होणार आहे.सध्याच्या खर्चात अजुन अडीच लाख रुपये रोज जादा मोजावे लागणार आहेत. राज्यात लेकसंख्येच्या तुलणेने सर्वाधीक पाव खपणारे शहर म्हणुन नाशिकचा समावेश होत आहे. कारण मुंबईत यापेक्षा जादा पाव खपत असले तरी तेथील लोकसंंख्येचा विचार करता नाशिक त्या तुलणेने अधीक आहे. नाशिक मिसळीसाठी जसजसे प्रसिध्द होत गेले तसतसा पावचा खपही वाढत चालला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com