नाशकात मंत्रीमहोदयांचा जत्था; लग्नासोबत विकासकामांचाही धडाका

नाशकात मंत्रीमहोदयांचा जत्था; लग्नासोबत विकासकामांचाही धडाका

नाशिक | प्रतिनिधी

आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नागरी आणि अन्न पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे सर्वजण आज दौऱ्यावर आहेत....

एकाच वेळी अनेक मंत्री का आले असावेत? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असतानाच शासकीय दौऱ्यासोबतच सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या व जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांचा आज विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी हे सर्वजण आज नाशकात दाखल झाले.

सिद्धार्थ वानखेडे यांच्यासोबत सीमंतिनी विवाहबद्ध झाल्या आहेत. आज दुपारी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण पुरोगामी विचारसरणीचे असून हा विवाह सध्या पद्धतीने करण्याचे ठरवले असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले.

दरम्यान, शहरातील रेसिडिंग वॉटर रिसोर्ट येथे रिसेप्शन आयोजित करण्यात आले असून याठिकाणी हे मंत्रीगण उपस्थिती दर्शिवणार आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांनीही लग्नाला हजेरी लावण्याच्या निमित्ताने एकाच दौऱ्यात अनेक कामे आटोपली आहेत.

तर दुसरीकडे सुनील केदार हेदेखील विवाह सोहळ्याला उपस्थित राहून गंगापूर रोड बोटक्लब नाशिक शहरातील क्रीडा संकुलांना भेट देणार आहेत. मंत्री भरणे यांच्याही दौरयात विवाहास भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय दौऱ्यात कामात काम लग्नही आणि विकासकामांचे उद्घाटनही यानिमित्ताने मंत्री महोदयांनी आटोपले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com