नाशिक जिल्हा परिषदेत करोनाचा शिरकाव; अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर दुसऱ्यांदा पाॅझिटीव्ह

नाशिक जिल्हा परिषदेत करोनाचा शिरकाव; अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर दुसऱ्यांदा पाॅझिटीव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यभरासह नाशिक शहर (Nashik City) व जिल्ह्यातही करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातही (Nashik Zilla Parishad) करोनाचा शिरकाव (Covid Outbreak) झाला असून जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Zilla parishad president balasaheb kshirsagar) हे दुसऱ्यांदा कोरोना बाधीत झाले आहेत....

जिल्ह्यातील करोना बाधीतांची संख्या दिसागणिक वाढत असून जिल्हा परिषद मुख्यालयातील रोजच नवे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुले अधिकारी, सेवक चिंतेत असून सर्वच काळजी घेताना दिसून येत आहेत.

मात्र, प्रशासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर जि काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नसल्याचे चित्र आहे. मुख्यालयात जिल्हा भरातून येणाऱ्या अभ्यागतांची ऑक्सिजन व तापमान तपासणीही करण्यात येत नाही.

यामुळे मुख्यालयातील संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात करोना संसर्गाच्या सुरवातीला करोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अभ्यागतांना हात स्वच्छतेची सुविधा उभारण्यात आली होती.

अभ्यागत हात स्वच्छतेनंतरच कार्यालयांमध्ये जात होेते. मात्र, मागील लाट ओसरल्यानंतर हात स्वच्छतेची सुविधा प्रशासनाने बाजूला सारली आहे.

नो व्हॅक्सिन नो एंट्रीची अंमलबजावणी नाही (No implementation about No vaccine no entry in zp nashik)

सर्व सरकारी कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये 'नो व्हॅक्सिन नो एंट्री' या सूचनेचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेने या निर्णयाची अंमलबजावणीकरिता काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com