लॉकडाऊनमध्ये सरसावली तरुणाई

नाशिक युथ क्लबचा आदर्श
लॉकडाऊनमध्ये सरसावली तरुणाई

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

करोना संकटामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली तसेच आर्थिक परिस्थिती नसलेल्या सुमारे तीनशेहून अधिक कुटुंबियांना गेल्या काही महिन्यांपासून एक मदतीचा हात म्हणून तरुणाई पुढे आली. आपण समाजाचे काहीतरी देने लागतो या हेतूने या तरुणांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. नाशिक युथ क्लब नावाने तरुणांची एक संघटना अविरत सेवा देण्याचे कार्य करीत आहे...

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा विचार करून सर्वप्रथम स्वतःच्या खिशातील मोजक्या पैशांनी या नाशिक युथ क्लबच्या सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येत सामाजिक कार्याला सुरुवात केली.

जसजसं सामाजिक कार्य पुढे गेलं तसतसं दानशूर लोकांनी देखील या कार्यास हातभार लावण्यास सुरुवात केली. करोणा बाधितांसाठी रुग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था असो वा किंवा व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची व्यवस्था असो ही व्यवस्था पुरवण्यासाठी या तरुणाईने मोठ्या प्रमाणावर मदत केली.

सध्या अविरतपणे त्यांचे हे कार्य सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांसाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी देखील या तरुणाईतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.

रुग्णांसाठी व गरजूंना मदत करण्यासाठी नाशिक युथ क्लबचे रविराज पाटील, सुमित रायते, ऋषिकेश पाटील, वैशाली कांकरिया, अंकिता अहिरे, सागर काळकर, पूजा काळे, राज ठाकूर ,ओमेश सोनार अभिषेक दुसाने यांच्यासह युथ क्लबचे सदस्य प्रयत्नशील आहेत. या तरूणाईचा आदर्श जर सर्वांनीच घेतला तर नक्कीच रंजल्या-गांजल्या यांना मदत होऊ शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com