नाशिक ठरणार आगामी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रबिंदू!; हे आहे कारण...

नाशिक ठरणार आगामी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रबिंदू!; हे आहे कारण...

सातपूर | प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वीच खा. संभाजी राजे नाशिक दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर, मराठा क्रांती मोर्चातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक हे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र आहे...

गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे मराठा समाजाला आव्हान केले होते.

समाजानेही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, गेल्या काही वर्षांमध्ये छत्रपती संभाजी राजे यांची नाशिक भेट सातत्याने होऊ लागली आहे त्यांचा मवाळ स्वभाव सगळ्यांना माहिती आहे मात्र नाशिकमध्ये छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका पहिल्यांदाच आक्रमक पाहायला मिळाली. त्यामुळेच पुढील आरक्षणासंदर्भातील रणनीती नाशिक मधेच ठरू शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

याआधी अनेक वेगवेगळी आंदोलने झाली त्यामध्ये सुद्धा नाशिकमधील भूमिकाही महत्त्वाची ठरलेली आहे. आजपावेतो नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलने कुठलेही गट न पडता एक दिशेने झालेली आहेत.

याबाबत छत्रपती संभाजी राजेंचे निकटवर्तीय असलेले छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी राजेंनी नाशिककरांवर जबाबदारी दिल्यास ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे सांगत एकप्रकारे या बातमीला दुजोरा दिला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी अरबी समुद्रातील शिव स्मारक समितीचे माजी अध्यक्ष विनायक मेटे त्यांच्या पाठोपाठ दोन दिवसांपूर्वी खा. संभाजी राजे नाशिकमध्ये येऊन गेले आहे. आण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील काल नाशिक मध्ये आले होते. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर गायकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जरी निमित्त असले तरी मात्र यामागे मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी या भूमिकेवर विशेष चर्चा झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com