नाशिक पश्चिम वनक्षेत्र कार्यालयाचे स्थलांतर होणार

ब्रिटीशकालीन वास्तू कमकुवत झाल्याने निर्णय
नाशिक पश्चिम वनक्षेत्र कार्यालयाचे स्थलांतर होणार
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक वनवृत्तातील पश्चिम वनक्षेत्राचे कार्यालय (West Forest Office) उंटवाडी रोड (Untwadi Road) येथील वन विभागाच्या विश्रामगृह परिसरात (Forest Department Rest House Premises) स्थलांतरीत होणार आहे...

सध्याचे कार्यालय ब्रिटीशकालीन (British period) व तब्बल अठराव्या शतकातील (Eighteenth century) असल्याने ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे हे कार्यालय उंटवाडी रोड येथे कार्यालय हलविण्यात येणार आहे...

सध्याच्या विद्यमान कार्यालयात पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, लिपीक वर्ग आदींसह वन कर्मचाऱ्यांचा राबता आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु झाल्याने आणि या वास्तुंना कौलाचे छत असल्याने ते धोकादायक बनले आहे.

एखादी दुर्घटना होण्याआधीच येथून कार्यालय हलविले जाणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व साहित्य नूतन कार्यालयात हलविले जाईल. कार्यालय हलविले जाणार असल्याने वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची लगबग सुरु आहे.

सुमारे अठराव्या शतकात ही वास्तू ब्रिटीशांनी बांधल्याचा अंदाज आहे. याठिकाणी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांच्या घोड्यांसाठी शेड व लेबर शेडची व्यवस्था केली होती. गेल्या काही वर्षांपासून वन विभागाच्या पश्चिम कार्यालयाचा कारभार येथूनच सुरु आहे.

मात्र कार्यालयाच्या भिंती जुन्या होऊन त्या कमकुवत बनल्या आहेत. छतावरील कौलेदेखील जुने झाले आहे. त्यामुळे आता उंटवडीरोडवरील वनविभागाच्या विश्रामगृह भागात पश्चिम वनक्षेत्राचे कार्यालय स्थलांतरीत होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com