Exclusive Video : घराबाहेर पडताना जात-पात विसरा; गर्वाने म्हणा मी भारतीय...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दिवंगत बाबा हुदलीकर यांची 'देशदूत'ने 'क्रांतीदिनी' २०१८ साली घेतलेली मुलाखत
Exclusive Video : घराबाहेर पडताना जात-पात विसरा; गर्वाने म्हणा मी भारतीय...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज (ता.5) पहाटे 4 च्या सुमारास निधन झाले. सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक त्यांच्या जाण्याने पोरके झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. येथे शिकलेले अनेक मुले आज उच्चपदावर कार्यरत आहेत.

ऑगस्ट २०१८ या महिन्यात दैनिक 'देशदूत'कडून ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेल्या बाबांशी संवाद साधण्यात आला होता. यावेळी बाबांनी नाशिकसह परिसरातून स्वातंत्र्यलढा कसा उभारला गेला?, दारुगोळा, बॉम्ब कसे तयार व्हायचे, स्वतःच बुलेटीन कसे द्यायचे, यानंतर लढ्यातील अनेक घटना प्रसंग सांगितले.

मुलाखत सुरु असताना आजचा युवा कसा आहे? याबाबत कटाक्षाने त्यांनी जातीपातीला विरोध केला. सर्वप्रथम आपण भारतीय आहोत. घरातून निघाल्यावर जात विसरून आपण भारतीय आहोत असे जेव्हा म्हणणार तेव्हाचा खऱ्या अर्थाने मेरा भारत महान असे आपण म्हणू.

साहेब इंग्रज होते, अनेक वर्षे त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्य भारतात कलेक्टर असो किंवा शिपाई सर्वत्र त्यांना आज जे साहेब, भाऊसाहेब, रावसाहेब, तात्या म्हटले जाते. हे बोलणे टाळा, त्याऐवजी अहो..जाहो करा..ते सरकारी नोकर आहेत त्यांना आपण साहेब म्हणणे बांधील नाहीत. साहेब जे होते ते गेले, त्यांना जाऊन आज ६५ वर्षे झाली आहेत. असेही बाबा यांनी २०१८ च्या मुलाखतीत परखड मत मांडले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com