नाशिक । प्रतिनिधी

मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने गंगापूर येथील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेजचे उपशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे तसेच मुंबई येथील मरोळ, अंधेरी मराठी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक संजय रघुनाथ सोनवणे या दोन्ही निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र असलेल्या उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आला आहे...

हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातून बाळासाहेब सोनवणे यांना दिव्यांग व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि मुंबई जिल्ह्यातून संजय सोनवणे यांना नाट्य, एकांकिका, कथा, लेख, कविता यातील उत्कृष्ट लेखनाबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे वितरण दि. २९ डिसेंबर, मुंबई आणि ३१ डिसेंबर, नाशिक येथे होणार आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे, कार्याध्यक्ष प्रकाश सावंत, स्वागत समिती अध्यक्ष अमोल सुपेकर यांनी शिक्षकरत्न पुरस्कार महासम्मेलन सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी पुरस्कारार्थींचे सर्व क्षेत्रातुन स्वागत केले जात आहे.