प्राणवायु निर्मितीत नाशिक अव्वल - पालकमंत्री भुजबळ

प्राणवायु निर्मितीत नाशिक अव्वल - पालकमंत्री  भुजबळ

घोटी । वार्ताहर Ghoti

करोनाच्या corona काळात ऑक्सिजन oxygen टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी जिल्ह्याला 130 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 400 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी केले.घोटी येथे झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आल.े त्या प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, जिल्हा उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, तहसिलदार परमेश्वर कासुळे, महेंद्र पवार, माजी आमदार शिवराम झोले, जि. प. सदस्य अँड. संदीप गुळवे, उदय जाधव, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, अलका जाधव, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारूंगसे,

तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख, गटविकास अधिकारी लता गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, घोटी सरपंच अरुणा जाधव, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, रामरास भोर, सचिन गोणके, माजी सरपंच हरीश चव्हाण, शिवा काळे, संजय जाधव, निलेश कडु, आदी उपस्थीत होते.

घोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी व्यक्त केली. कायम स्वरूपी व्यवस्था म्हणुन आपल्या रुग्णालयात लागणारा ऑक्सीजन आपलेच रुग्णालयात उपलब्ध व्हावा यासाठी ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी केली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची निर्मिती होणार असुन सर्वसामान्य रूग्णासाठी कोविड सेंटरमधील ऑक्सीजन बेडची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.