Video : नाशिक-बेळगाव अवघ्या तासाभरात; स्टार एअरकडून २५ जानेवारीपासून सेवा

असे असतील तिकीट दर; आठवड्यातून 'या' तीन दिवशी विमान झेपावणार
Video : नाशिक-बेळगाव अवघ्या तासाभरात; स्टार एअरकडून २५ जानेवारीपासून सेवा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधून आणखी एक कंपनी विमानसेवा देण्यासाठी उत्सुक झाली आहे. येत्या २५ जानेवारीपासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा सुरु होणार असून अवघ्या १९९९ रुपयांत नाशिक ते बेळगाव अवघ्या तासाभरात गाठता येणे शक्य होणार आहे.

नाशिकहून आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही सेवा सुरु राहील.

कंपनीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत त्यापार्श्वभूमीवर बम्पर सवलत कंपनीकडून देण्यात आली असून यामध्ये आजपासून पुढील पाच दिवस म्हणून २५ जानेवारी पर्यंत तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना अवघ्या १२०२ रुपयांत नाशिक ते बेळगाव प्रवास करता येईल.

१ फेब्रुवारीपासून हे प्रवासी २५ फेब्रुवारीपर्यंत वरील बुकिंगवर प्रवास करू शकणार आहेत. या विमानसेवेमुळे नाशिक जिल्हा आणि नाशिकचा महत्वाचा भाग हा उत्तर कर्नाटकशी जोडला जाईल. यामुळे कर्नाटकातील महत्वाच्या चार जिल्ह्यांना नाशिक जोडले जाणार आहे.

तसेच गोवा जाणाऱ्या प्रवाशांना बेळगावमार्गे अवघ्या चार ते पाच तासांत नाशिकहून गोव्याला पोहोचणे शक्य होणार आहे. बेळगाव ते गोवा 104 किमी अंतर तीन तासांच्या अंतरात पार करता येते अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com