स्टार एअरच्या 42 प्रवाशांनी घेतला नाशिक-बेळगाव सेवेचा लाभ

स्टार एअरच्या 42 प्रवाशांनी घेतला नाशिक-बेळगाव सेवेचा लाभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कोरोनामुळे लावलेले निर्बंध हळूहळू हटविले जात असल्याने येत्या २ जुलैपासून बेळगाव-नाशिक (Belgaon to Nashik) विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली असून, पहिल्या दिवशी बेळगावहुन नाशिकसाठी 25 तर नाशिकहून बेळगावसाठी 17 प्रवासी रवाना झाले...

स्टार एअरकडून (Star Air Service) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. १ हजार ९९९ रुपयांपासून तिकिटाचे दर ठेवण्याची आले आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही सेवा सुरू राहणार, आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध राज्यांनी करोनामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे प्रवासी संख्या घटून विमानसेवा बंद करण्याची वेळ कंपन्यांवर आली होती.

नाशिकमधून यापूर्वी सूरु असलेल्या दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, पुणे, बेळगाव, अहमदाबादसाठी सेवाही प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने बंद करण्यात आल्या होत्या. येत्या15 जुलैपासून या सेवा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com