नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रा. डॉ. अविराज तायडे, सुमूखी अथणी,विद्या करंजीकर यांची सेन्सॉर बोर्डावर निवड
नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाशिक । प्रतिनिधी

येथील प्रख्यात गायक प्रा. डॉ. अविराज तायडे, प्रसिद्ध नृत्यांगणा सुमुखी अथणी आणि अभिनेत्री विद्या करंजीकर यांची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजेच सेन्सॉर बोर्डांच्या सदस्यपदी निवड झाली आहे. तीघांच्या निवडीमूळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच यानिमित्ताने खोवला गेला आहे...

आज सुचना आणि माहिती प्रसारण मंत्रालय सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी आज दोघा सदस्यांना पत्र पाठवले आहे. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली असून मुंबई क्षेत्रासाठी ही निवड असल्याचे जाहिर करण्यात आले.

‘सीबीएफसी’ ही एक सरकार मान्यताप्राप्त संस्था असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत या संस्थेचे काम चालते. ही संस्था देशातील चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचे काम करते. तयार केलेल्या चित्रपटाचे पडसाद समाजावर उमटत असतात त्यामुळे तो जसाचा तसा प्रदर्शित करता येत नाही.

यावेळी काय दाखवावे, काय नाही यावर कोणाचे तरी लक्ष असावे लागते. नेमके हेच काम सेन्सॉर बोर्ड करत असते. भारतातील कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डांची परवानगी लागते. अतिशय कडक नियमांमुळे भारतीय सेन्सॉर बोर्ड हे जगातील सर्वात शक्तीशाली सेन्सॉर बोर्डपैकी एक अशी ओळख आहे.

माझी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदी निवड झाली ही माझ्यासाठी फार मोठे यश आहे. दिलेल्या जबाबदारीचे चीज करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे. करमणूकीतून ज्ञान निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. कौटुंबिक, सामाजिक अणि आनंददायी चित्रपट कसे समाजापुढे जातील यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रा. डॉ. अविराज तायडे, प्रख्यात गायक नाशिक

माझं क्षेत्र नृत्याचे असल्याने माझ्यासाठी हे पुर्णपणे वेगळे क्षेत्र आहे. त्यामूळे वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरीकांच्या नव्या ओळखी होतील. वेगळं क्षेत्र आहे, नवं काहीतरी करून दाखविण्याची संधी इथे आहे. येणार्‍या काळात नाशिक चित्रनगरी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सुमूखी अथणी, कलानंतर कथक नृत्य संस्था नाशिक

अभिनय क्षेत्रात मी असले तरीदेखील काहीतरी चांगल चुंगलं यातून कसे निर्माण होइल असा प्रयत्न असेल. अजून कामाचे स्वरुप समजले नाही. काम नाशिकमध्ये बसून करायचे की मुंबईत जाऊन याबाबतही अजून माहिती नाहीये. परंतू सेन्सॉर सदस्य म्हणून आपल्याचा चुकीच्या गोष्टी समाजात जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे हाच उद्देश असल्याने यातून चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विद्या करंजीकर, अभिनेत्री नाशिक

कोण आहेत प्रा. अविराज तायडे?

संगीताचे शिक्षण पं. राम माटे, पं. भिमसेन जोशी, पं. सि. आर. व्यास. संपुर्ण भारतातील जवळपास सर्वच राज्यातील सर्व प्रमुख संगीत महोत्सवात गायन केले आहे. भारताबाहेरदेखील ऑस्टे्रलिया, सिंगापुर, मलेशिया, थायलंड इत्यादी देशांत गायनाचे कार्यक्रम त्यांचे झाले आहेत.

पं. भिमसेन जोशी रत्नपुरस्कार, पं. गजानन बुवा जोशी पुरस्कार, जनस्थान आयकॉन पुरस्कार, पं. मनोहर पोतदार पुरस्कार, व्यवसाय कला पुरस्कार, तीन वर्षे आदर्श शिक्षक पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, सध्या नाशिकच्या एसएमआरके महाविद्यालयात संगीत विभागप्रमुख तर मुंबईच्या एस. एन. डी.टी. विद्यापीठात ललीत कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत.

कोण आहेत विद्या करंजीकर?

विद्या करंजीकर नाटक, टी.व्ही.मालिका, चित्रपट अभिनेत्री म्हणून नावलौकीक मिळवला आहे. सुरुवातीचे दहा वर्ष पत्रकारीता, त्यानंतर 8 वर्षे त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. मायदेशी परतल्यावर त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. 23 वर्षानंतर पुनरागमण करत नासूर, शागिर जोगवा, वंशवेल, कृतांत चित्रपटात त्यांच्या भुमिका होत्या.

तसेच आगामी कावर, अरुणा67, आणि लग्नकल्लोळ चित्रपटातही त्यांच्या भूमिका आहेत. व्यवसायिक नाटकं, निष्पाप, आईशप्पथ, वट वट सावित्री, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, कब्बडी कब्बडी, त्या एका वळणावर, बहुरुपी, प्रेमाच्या गावा जावे भय इथले संपत नाही, कसाब आणि मी, रक्तपुष्प, आषाढातील एक दिवस, माझा खेळ मांडू दे ही गाजली.

अमेरिकेतही त्यानी काही नाटकं सादर केली ओंम नमोजी आद्या, एक ओसाड गाव, सावल्या, वाडा चिरेबंदी, मन माझे झुलताना, प्रेमपत्र सादर केले. टी. व्ही.मालिकांमध्ये तुझ्या वाचून करमेना, शुभंकरोती, महासंग्राम, दोन घडीचा डाव, हे बंध रेशमाचे, तू तिथे मी विवाह बंधन, लगोरी, अस्मिता पुढचे पाऊल, रुंजी 100 डेज़,राधा प्रेम रंगी रंगली गोठ, तुला पाहते रे, सध्या चालू असलेली मालिका चांदणे शिंपीत जाशी यातही त्यांच्या भुमिका आहेत.

कोण आहेत सुमूखी अथणी?

नाशिकमधील कलानंद कथक नृत्य संस्थेच्या संचालिका आहेत. त्या त्यांच्या आई गुरु संजीवनी कुलकर्णी यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षापासून नृत्य शिकत आल्या आहेत. 2019 साली त्यांनी जेजेटी विद्यापीठातून पीएचडी केली आहे. तसेच 1995 पाणी कलानंतर कथक नृत्य संस्थेच्या माध्यमातून हजारो शिष्यांना त्यांनी कथकचे धडे दिले आहेत.

यासोबतच परफॉर्मिंग आर्टस्च्या विद्यार्थ्यांना ते गेल्या नऊ वर्षांपासून शिकवतात. 2010 पासून त्यांनी समूहनृत्यामध्ये सहभाग घेतला होता. यादरम्यान त्यांनी देशातील राजधानीसह वेगवेगळया शहरात त्यांनी नृत्य सादर केले. वैयक्तिक नृत्य प्रकारात त्यांनी 1998 पासून आजतागायत नावलौकीक मिळवला आहे. यासोबतच त्यांचे अमेरीका, इटली आणि थायलंडमध्येही नृत्य तसेच वर्कशॉप झाली आहेत.

दशावत्र, राजपूत रामाणी, चतूरंग, ताल चक्र, कृष्णं वंदे जगतगुरू, कृष्ण कथा आणि गीता सार यामध्ये त्यांनी स्वतः कोरीओग्राफी केली आहे. तसेच 15 ते 20 वेगवेगळ्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्यादेखील मानकरी त्या ठरल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com