कृषी पुरस्कारांत नाशिक तृतीय

कृषी पुरस्कारांत नाशिक तृतीय

नाशिक । नरेंद्र जोशी | Nashik

गेल्या तीन वर्षात राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने (Kolhapur District) कृषी क्षेत्रात (Agriculture sector) आधुनिकतेची कास धरुन सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा जिल्हा म्हणून नोंद केली आहे. कोल्हापूर प्रथम, पुणे (pune) द्वितीय व नाशिक (nashik) तृतीय स्थानावर राहिले आहे.

गेल्या दोन वर्षात करोनामुळे (corona) कोणताही कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे गेल्या 2017 पासूनचे रखडलेले कृषी पुरस्कार वितरण (Agricultural Award Distribution) यदा नाशिकला (nashik) होत आहे. आरेग्य विज्ञान विद्यापीठात (University of Health Sciences) त्याची जय्यत तयारी सुरु आहे. 2017, 18 व 19 सालचे हे पुरस्कार आहेत. जे शेतकरी (farmers) आधुनिकतेची कास धरतात. नवनवीन प्रयोग करुन आदर्श घडवतात, त्यांंच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी 11 प्रकारचे पुरस्कार कृषी खाते देते.

त्यात डॉ.पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) कृषीरत्न, वसंतराव नाईक (Vasantrao Naik) कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंंद्रीय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण गट) व दुसरा पुरस्कार आदिवासी गटाला असतो. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार, तसेच राज्यस्तरीय पीक स्पर्धा (भात) व (सोयाबीन) यातून पुरस्कारार्थी निवडले जातात.

2017 ते 2019 दरम्यान नाशिकचे 25, पुण्याचे तीस, कोल्हापुरचे 44, अमरावतीचेे 17, औरंगाबादचे 18, कोकणचे 26, लातुरचे 17, नागपुरचे 21, पुरस्कारार्थी आहे. त्या सर्वांंचा एक मे रोजी सन्मान होणार आहे.सन2016 पर्यंत कृषी विभागाने पंजाबराव देशमुुख कृषीरत्न पुरस्कार 19 जणांना दिलेे. वसंतराव नाईक कृषी भुषण पुरस्कार 264 जणांनी प्राप्त केले. जिजामाता कृषीभुषण 102 जणांना मिळाला.

वसंतराव नाईक शेतीमित्र 72 जणांनी प्राप्त केला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारार्थी राज्यात 1396 आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार सहा जणांना मिळाला आहे. उद्यान पंंडित 198 झाले आहेत. सेंंद्रीय शेंती पुरस्कार 55 जणांनी प्राप्त केला आहे. राज्यस्तरीय पीक स्पर्धेत आतापर्यंंत तीनशे जणांनी पुरस्कार पटकावले आहेत. शेती व शेेती पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना यानिमित्ताने समाजासमोर आणून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा हीच कृषी खात्याची इच्छा आहे.

Related Stories

No stories found.