Video : मंदिरं उघडणार; नाशकात आनंदोत्सव

Video : मंदिरं उघडणार; नाशकात आनंदोत्सव
नाशिक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात कोरोनाचा (Corona) विळखा हळूहळू सैल होत असताना नवरात्रीच्या (Navaratri) पहिल्या माळेला म्हणजे येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील मंदिरे (Temples) भाविकांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिली. यानंतर धार्मिक पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या नाशकात आनंदोत्सवच जणू सुरु झाला....

(व्हिडीओ : सतीश देवगिरे, नाशिक)

आज गंगेवर (Godavari River) अनेक भाविकांनी एकत्र येत याठिकाणी पेढे भरवत आनंदाचा क्षण साजरी केला. अनेक व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया यावेळी 'देशदूत'ने घेतल्या. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता. मंदिराबाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी भाविकांना करोनाचे नियम पाळत दर्शनासाठी यावे अशी साद घातली आहे.

गेल्या दीड वर्षात खूप नुकसान झाल्याचेही अनेकांनी बोलून दाखवले. त्यामुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद असून गंगेवर सर्वत्र आज आनंदोत्सव साजरी करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.