नाशिक तालुका वार्तापत्र: अतिवृष्टीमुळे तालुक्यावर जीवघेणे संकट

नाशिक तालुका वार्तापत्र: अतिवृष्टीमुळे तालुक्यावर जीवघेणे संकट

नाशिक | Sudhakar Godse | Nashik

वातावरणात होत असलेला बदल, वाढलेले तापमान (temperature) कोसळणार्‍या पावसामुळे (rain) पिकांची मोठया प्रमाणावर हानी होत आहे.

हे अस्मानी संकट जीवघेणे ठरत असताना गुरूवारी झालेली जीवितहानी काळजी करणारी ठरत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने (District Administration) सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन संकटाशी मुकाबला करणार्‍यांना दिलासा देण्याचे काम करणे गरजेचे झाले आहे.

तालुक्यात सध्या प्रमाणापेक्षा जास्त पाऊस (heavy rain) असल्याने द्राक्ष बाग (vineyard), डाळिंब (Pomegranate), भाजीपाला (vegetables), सोयाबीन, भात अशा विविध प्रकारच्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. डोळ्यांसमोर पिकविलेला शेतमाल वाया जाताना बघून शेतकर्‍यांच्या (farmers) तोंडचे पाणी पळाले आहे. अतिवृष्टीमुळे (heavy rain) केवळ पिकांचेच नव्हेतर जमिनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकर्‍यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

यंदा जुलैमध्ये अतिवृष्टी (heavy rain) झाल्यामुळे शेतात पाणी घुसले. त्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांच्या उभ्या पिकाला बसला. सोयाबीन, भात, टोमॅटो, भाजीपाला या पिकांसह द्राक्ष बागावरही परिणाम झाला. अनेक शेतातील माती वाहून गेल्याने जमीन पीकपेर्‍याच्या देखील लायक राहिली नाही. काही विहिरी पाणी व गाळाने भरून गेल्याने त्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय विहिरीतील वीज पंप (Power pump), पाईप लाईन देखील वाहून गेल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिकहानी झाली.

कधी नव्हे ती ढगफुटी (cloudburst) झाल्याने गावातील रस्त्यासह शिवार रस्तेही वाहून गेल्याने बाहेरून येणार्‍यांना गावात जायचे कसे असा प्रश्न पडला. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarwadi), लोहशिंगवे परिसरात ही परिस्थिती निर्माण झाली. येथील अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुग्ध व्यवसाय करणार्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले.

अति पावसामुळे सोयाबीन, कोबी, फ्लॉवर व इतर नगदी पीक शेतातच सडून गेले. त्यामुळे पेरणीपूर्व केलेला खर्च तसेच त्यानंतर बियाणे व औषधांसाठी झालेला खर्च पूर्णपणे पाण्यात गेला. तालुक्यात प्रथमच अशी ढगफुटी झाल्याने सर्वत्र एकच हाहाकार झाला. लोकप्रतिनिधीही खडबडून जागे झाले. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. हेमंत गोडसे, आ. सरोज आहिरे, माजी आमदार योगेश घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, समाजसेविका तनुजा घोलप यांनी तातडीने या भागाकडे धाव घेत शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

तसेच भाजपचे नाशिक तालुका अध्यक्ष नितीन गायकर यांनीही पालकमंत्री गिरीश महाजन यांचेकडे मदतीचा प्रस्ताव सादर करत सामाजिक दावित्व निभावले. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांचेसह परिसरातील विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीचे मदत मिळावी, अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली.

ढगफुटीमुळे सिन्नर व निफाड तालुक्यातही झालेल्या नुकसानी पार्श्वभूमीवर शासकीय अधिकार्‍यांनी पाहणी करून लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देताना मदतीची ओघही सुरू केला.

मात्र नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे अद्यापही शासन स्तरावर पाहिजे ती मदत मिळत नाही, असा दावा शेतकरीवर्गातून होत आहे. शासकीय अधिकार्‍यांनी कोठेही भेदभाव न करता शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देणे क्रमप्राप्त आहे. या भागातील शेतकर्‍यांचा खरीप हंगाम नुकसानग्रस्त ठरत असला तरी आगामी रब्बी हंगामासाठी तो निश्चितच लाभदायी ठरू शकतो. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस तालुक्यात होत असल्याने आज एकाही गावात टँकर सुरू झालेला नाही.

त्यात अद्यापही परतीचा पाऊस बाकी असल्याने किती प्रमाणात नुकसान होईल, हे सांगणे देखील कठीण आहे. मात्र संभाव्य धोके लक्षात घेऊन गावपातळीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाने योग्य ती काळजी घेतल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटास तोंड देताना बळ मिळेल, याचाही कुठेतरी विचार होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com