प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे काळाच्या पडद्याआड

प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे काळाच्या पडद्याआड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये प्रतिकुल परिस्थितीत तबला प्रसार व प्रचाराचे कार्य करणारे जेष्ठ तबला वादक पं. विजय हिंगणे (८४) (Vijay Hingane) यांचे निधन झाले. बऱ्याच दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होता...

गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातू असा परिवार आहेत.

नाशिकमध्ये गेल्या पन्नास ते साठ सालाच्या दरम्यान तबला प्रसिद्धी आणि शिकण्याकडे म्हणावा तितका कल नव्हता. अशा काळामध्ये भाविक टोपण नावाने ओळखले जाणारे भानुदास पवार, विजय हिंगणे आणि कमलाकर वारे या तिन मित्रांनी नाशिकमध्ये तबल्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरूवात केली.

मुंबईतल्या ज्येष्ठ श्रेष्ठ तबला वादकांना नाशिकला आणण्याचे, तसेच नाशिकमधील तरुण उमद्या कलाकरांना त्यांच्या सानिध्यात त्यांना शिकण्यास संधी उपलब्ध करून देण्याच कार्य त्यांनी केले.

गाण्याची साथसंगत हा अतिशय आवडता विषय असलेले पं. हिंगणे यांची उत्कृष्ट साथसंगत म्हणून नावलौकिक मिळविलेले तबला वादक अशी ओळख होती. त्यांच्या जाण्याने तबला वादन क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

कलावंत म्हणून जितके श्रेष्ठ होते त्याहीपेक्षा त्यांच्यातला माणूस अधिकश्रेष्ठ. कायम स्मरणात राहील असं अमूल्य योगदान. नाशिक मध्ये आज तबल्याचा वाढलेला वृक्ष यामध्ये त्यांचं मोठे योगदान आहे. त्या योगदानामुळेच आज नाशिकची तबला पिढी जिवंत आहे. त्यांच्या दमदार आणि आसयुक्त गाण्याच्या साथीवरचा ठेका कायम स्मरणात राहील.तबला वादन क्षेत्रात भूतकाळ आणि भविष्य काळाचा ब्रीज असलेले विजय हिंगणे यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे.

नितिन वारे (तबला वादक)

Related Stories

No stories found.