सुविचार गौरव पुरस्कार जाहीर; अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश

सुविचार गौरव पुरस्कार जाहीर; अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांना “सुविचार गौरव” पुरस्काराने (Suvichar Gaurav Award) सन्मानित केले जाते. यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री पुजा सावंत (Actress Pooja Sawant), अभिनेता चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) यांचा समावेश आहे. मान्यवरांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil, Maharashtra Minister, Water Resources Department & CAD) यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्तावही मागविण्यात आले होते. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली.

यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पुजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

हेमंत राठी यांना “जीवन गौरव” (Life time achievement award) पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगांवकर (वैद्यकीय) (Dr Atul Wadgaonkar), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक) (Rted Principle Madhukar Kadlag), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं.क.कापडणीस (साहित्य) (S K Kapadnis writer), नितीन महाजन (प्रशासन) (Nitin Mahajan), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु ईश्वरी सावकार (Ishwari Sawkar) (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) (Kishor Khairnar) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व जेष्ठ साहित्यिक प्रा.विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.

पुरस्कारांचे वितरण २ जानेवारीला

पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी (दि. ०२) रोजी सांयकाळी ४ वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड.अशोक खुटाडे व सचिव अॅड.रविंद्र पगार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com