नाशिक-सुकेणा शहर बससेवेचा मार्ग मोकळा

नाशिक-सुकेणा शहर बससेवेचा मार्ग मोकळा

कसबे सुकेणे । प्रतिनिधी Kasbe Sukene

ओझर (Ozar) येथील एचएएल (HAL) कंपनीचे मुंबई-आग्रा महामार्ग (Mumbai-Agra Highway) गेट क्रमांक 1 ते मरीमाता गेट (सुकेणे रस्ता) हा वापरण्यासाठी सर्वसामान्यांना खुला करावा असा महत्वपूर्ण निकाल निफाडच्या (niphad) प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी दिला.

त्यामुळे सुकेणेसह (sukene) दहा गावातील सर्वसामान्य जनता, विद्यार्थी (students), शेतकरी (farmers), व्यवसायिक व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.ओझर येथील एचएएल कंपनीच्या गेट क्रमांक 1 ते मरीमाता गेट सुकेणे रस्ता प्रशासनाने बंद केला होता. त्यामुळे कसबे सुकेणेसह ओणे, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, शिलेदारवाडी, भाऊसाहेबनगर, पिंपळस रामाचे, ओझर शहर व परिसर येथील जनतेचे अतोनात हाल होत आहे.

दरम्यान करोना (corona) नंतर सार्वजनिक बस व्यवस्था सुरळीत सुरू झाली असताना केवळ एचएएल प्रशासनाने मरीमाता गेट ते मुंबई-आग्रा महामार्ग प्रवेशद्वार क्रमांक 1 बंद ठेवल्याने सीबीएस (CBS) ते सुकेणा ही शहर बस सेवा (City bus service) व इतर राज्य परिवहन महामंडळाची (transport corporation) बस सेवा सुरू होऊ न शकल्याने आजपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकरी, व्यवसायिक, नोकरदार, औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, विविध संस्थांचे कर्मचारी यांना नाशिकला (nashik) कामकाजासाठी ये-जा करण्यास अडचणीचे ठरत आहे.

परिणामी याबाबत आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर गेट खुले करावे अशी सूचना केली होती. त्यानंतर प्रतिभा धनवटे, भूषण धनवटे, रवींद्र माळोदे, संदीप जायभावे, अशोक कदम, रामभाऊ चौधरी, देवीदास चौधरी, आनंदा गाडे, किशोर पागिरे, दत्तू बोराडे, रमेश घुगे, संदीप कातकाडे, धनंजय भंडारे यांनी एचएएल च्या विरोधात उपविभागीय अधिकारी डॉ.पठारे यांचेकडे फौजदारी खटला दाखल केला होता. यात अर्जदारांतर्फे खेरवाडी येथील अ‍ॅड. संदीप केदू पवार, अ‍ॅड. तेजल पवार यांनी कामकाज पाहिले.

निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या लेखी युक्तिवादातील सर्व मुद्यांची पाहणी करत तसेच एचएएल कंपनीच्या वतीने दाखल केलेला जबाब, अर्ज, दाखल पुरावे व स्थळ पाहणी पंचनामा याचे अवलोकन करून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच स्थळ निरीक्षणा दरम्यान काही वस्तुस्थिती निदर्शने नोंदविली त्यावरून अर्जदार यांच्या म्हणण्यानुसार व प्रत्यक्ष स्थळ निरीक्षणावेळी निदर्शनास आलेल्या शेतकर्‍यांच्या

म्हणण्यानुसार शेतमालाची ने-आण व बसची वाहतूक मात्र सामनेवाले सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधित आहे. परंतु सदरचा रस्ता हा येथील टाउनशिप पश्चिमेकडील संरक्षण भिंतीलगत असून त्याचा येथील नागरिक वसाहतीमध्ये प्रवेश होत नाही. त्याबाबत स्थळ निरीक्षण नकाशा दाखल झाला होता. या सर्वांचे अवलोकन करून निफाडचे उपविभागीय अधिकारी यांनी सदरचा मरिमाता गेट व गेट क्रमांक 1 दरम्यानचा रस्ता वापरणे बाबत प्रतिबंध करू नये.

तसेच बंद केलेले मरीमाता गेट खुले करावे व सदरचे गेट खुले केल्यानंतर मरीमाता गेट व गेट नंबर 1-2 पर्यंतची वाहतूक अटी व शर्ती (Terms and conditions of transportation) घालून नियमित करावी असा आदेश दिला आहे. या आदेशामुळे शेतकरी, प्रवाशी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच हा खटला विनामोबदला चालविल्याबद्दल ओझर, सुकेणे, दीक्षी, दात्याणे, थेरगाव परिसरातील ग्रामस्थांनी अ‍ॅड.संदिप पवार, अ‍ॅड.तेजल पवार यांचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com