नाशिक : प्रतिनिधी

सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नवीन व जुन्या अभ्यासक्रमाच्या या निकालात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. नाशिकचा रौनक जैन याने राष्ट्रीय क्रमवारीत तेविसावा क्रमांक पटकावला आहे...

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे सनदी लेखापाल शिक्षणक्रमाशी निगडित विविध स्तरांच्या परीक्षा घेतल्या जातात.

नोव्हेंबर २०२० मध्ये जुन्या व नवीन अभ्यासक्रमासाठी फायनल (अंतिम) परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नाशिकच्या रौनकने ८०० पैकी ५४१ गुण मिळवीत राष्ट्रीय क्रमवारीत स्थान राखले आहे.

या परीक्षेत सुशांत पवार (४९३), तेजस लोढा (४२७), कुलभूषण पाटील (४१९) यांनीही यश मिळविले आहे. अन्य यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तौसिफ शेख, हर्षाली मराठे, वर्धन जाजू, प्रतीक्षा दोषी, स्वप्नील वाघ, आदित्य जाजू, संयमी बागमार, सेजल सुराणा, प्रणीत गदिये, प्रतीक जेजूरकर, प्रणीत जैन, हर्षल जैन, प्रियांका ठक्कर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे