Video : वाहनांची होतेय ठिकठिकाणी तपासणी; विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

Video : वाहनांची होतेय ठिकठिकाणी तपासणी; विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आज दुपारी १२ वाजेपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली. शासनाच्या नियमावलीप्रमाणे सकाळी अकरा वाजेनंतर मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद करण्यात आली आहेत. तर उद्यापासून सकाळी ७ ते ११ यादरम्यान केवळ पार्सल किंवा होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे...

आज दुपारी बारा वाजेनंतर चौकाचौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी, ओळखपत्र, बाहेर पडण्याचे कारण विचारात पोलिसांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

अनेकांनी ड्युटीवरून घरी परत चाललो आहे, मेडिसिन घ्यायला निघालो आहे, हॉस्पिटलला जायचे आहे असे अनेक कारण सांगून कारवाई पासून स्वत:चा बचाव केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com