नाशिकच्या जवानाला जम्मू-काश्मीर येथे वीरमरण

नाशिकच्या जवानाला जम्मू-काश्मीर येथे वीरमरण

नाशिक | Nashik

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) उगांव (Ugaon) येथील मुळचे रहिवाशी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) (Janardan Dhomse) यांना जम्मू - काश्मीर (Jammu and Kashmir) येथे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले आहे...

उगांव येथील रहिवाशी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे ते सुपूत्र आहेत. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगांव येथे झाले होते. १२ वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातूर (Latur) येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश घेतला होता.

तसेच २००६-२००७ मध्ये सर्वप्रथम कच्छभोज त्रिपुरा आसाम आणि आता जम्मू काश्मीर येथे ते सेवा बजावत होते. तीन वर्षानंतर त्यांची सेवा संपणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांना कर्तव्यावर असतांना वीरमरण आले असून त्यांच्या मृत्यूची (Death) माहिती कुटुंबीयांना फोनद्वारे देण्यात आली आहे.

दरम्यान, जनार्दन ढोमसे यांचे वडील उत्तम बाबुराव ढोमसे व आई हिराबाई उत्तम ढोमसे हे शेती व्यवसायानिमित्त मरळगोई खुर्द येथे स्थलांतरीत झालेले आहे. जनार्दन यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा आणि पत्नी रोहीणी, मुलगा पवन (८) मुलगी आरु (२) भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे. तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाकडे अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com