स्मार्ट सिटीत आमचा वाटा कुठे आहे? मनपात समाविष्ट २३ खेड्यांंचा आर्त सवाल

स्मार्ट सिटीत आमचा वाटा कुठे आहे? मनपात समाविष्ट २३ खेड्यांंचा आर्त सवाल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगर स्मार्ट होत असतांना शहरात समाविष्ट झालेली २३ खेडीही स्मार्ट होणार की अजुन २५ वर्ष त्यांना तसेच खेळवत ठेवणार? हा प्रश्‍न आता एैरणीवर आला आहे....

कोटयावधी रुपये खर्च करन नाशिक स्मार्ट सीटी करण्यासठी गेल्या पाच वर्षापासुन प्रयत्न सुरु आहेत. आणखी दोन वर्ष त्याला मुदत वाढ मागितली जात आहे. मात्र, गेल्या तीस वर्षापुर्वी नाशिक महापलीकेचे स्वप्न साकर करण्यासठी आवश्यक लोकसंख्येची अट पुर्ण व्हावी म्हणून नाशिकरोड सातपुर नगरपालिका बरखास्त करुन शहरा लगतची २३ खेडी नाशिक महापालिकेत समाविष्ट झाली.

त्यांंच्या पर्यंत रस्ते, पाणी, लाईट सोडले तर फारसे काही पोहचलेच नाही. आजही या २३ गावामध्ये गेल्यानंंतर तेथील विकास पाहता ती गावे खरोखर महापालिकेत समाविष्ट झाली आहे की केवळ कागदोपत्री समाविष्ट झाली? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.

कर मात्र शहरी भागा सारखेच वाढले आहेत. त्याचा भार त्यांनी सहन केेला. मात्र, विकासाची फळे ठऱावीक भागालाच चाखयाला मिळत आहेत. नाट्यगृह, सभागह, क्रिडांंगणे, अद्यावत उद्याने, स्मार्ट रस्ते यासाठी आजही मध्य नाशिक, पश्चिम नाशिक, पंचवटी व नाशिक रोडच्या ठराविक भागातच दिसतात.

आजही आडगाव, म्हसरुळ मखमलाबाद, वडनेर दुमाला, चाढेगाव, गंगापुर, वडाळा गाव, अंबडगाव, कामठवाडे परीसरात गेल्यानंंतर ती उणिव भासल्याशिवाय राहत नाही. म्हणुनच स्मार्टसीटीत आमचा वाटा कुठे आहे हो? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

एका खेेड्याचा एक वॉर्डेला क. एकच नगरसेवक राहीला तर कदाचीत चांंगला विकास होईल. वार्ड रचनेमुळे मुळेगाव बाजुला राहते. ठऱावीक भागाचाच विकास होत आहे, नगरसेवकांंच्या सुचनांकडे लक्ष्य दिले जात नाही. त्यामुळे शहराचा विकास होतो. पण आजु बाजुचे खेड भकास राहतात,अशी स्थिती आहे.

प्रभाकर पाळदे ( माजी नगरसेवक वडनेर दुमाला )

स्मार्ट सीटी प्रकल्प व ते पैसे महापालीककडे वर्ग केले तर हवा तसा विकास शक्य होईल. शहराचा जो भाग विकासा पासुन वंंचीत आहे. तेथे विकास शक्य होईल. सध्या स्मार्ट सीटी ठरवेल तेथेच विकास होत असल्याने समाविष्ट खेडी भकास होत आहे.

राहुल दिवे ( नगरसेवक )

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com