पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा करंजवण धरणात बुडून मृत्यू

पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा करंजवण धरणात बुडून मृत्यू

ओझे | वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणात (Karanjwan Tal Dindori) आज दुपारी करंजवण येथील साई संदिप मोरे (वय १६) हा युवक करंजवण धरणात (Karanjwan Dam) पोहण्यासाठी गेला असता मोठ्या पाण्यात गेल्यामुळे मृत्यू झाला असून स्थनिक नागरिकाच्या मदतीने सुमारे अडीच तासाने बुडलेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे....

जेव्हा साई धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरला तेव्हा आजूबाजूला अनेक ठिकाणाचे युवक पोहण्यासाठी आले होते. त्यामुळे साई पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले नाही. मात्र, काही वेळाने हे लक्षात आले. तोपर्यंत उशीर झाला होता.

मयत साई याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. या घटनेमुळे करंजवणसह आजूबाजूच्या गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com