शिवसेना आमदार कांदे यांचा पोलीस आयुक्त नोंदवणार जबाब; हे आहे प्रकरण

शिवसेना आमदार कांदे यांचा पोलीस आयुक्त नोंदवणार जबाब; हे आहे प्रकरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे (Shivsena MLA Suhas Kande) आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्यात रंगलेल्या वादाला धमकी प्रकरणानंतर नवे वळण लागले. पोलीस आयुक्तांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानुसार आज आमदार कांदे नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात (Nashik City Police Commissioner Office) पोहोचणार आहेत. पोलीस आयुक्त आमदार कांदे यांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील अहवाल देणार आहेत...

जिल्हा नियोजन निधीबाबत (District Planning Fund) असलेला विषय असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त पांडेय (CP Deepak Pandey, Nashik) यांनी आमदार कांदे आणि निकाळजे यांचे जबाब नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी मध्ये कॉल रेकॉर्डिंग द्यायला दोघेही असमर्थ असल्याने आता पोलीस आयुक्त चौकशीअंती काय निर्णय घेता हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव असल्याने पोलीस आयुक्तांनी हें प्रकरण गांभीर्याने घेत, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दोघांचे जबाब नोंदवून स्वतः चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या दोघांच्याही चौकशीतून नेमके सत्य बाहेर येणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे आहे प्रकरण

जिल्हा नियोजन समितीचा निधी मतदारसंघाला कमी दिल्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुध्द शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना अक्षय निकाळजे यांनी फोनवरुन धमकावल्याची तक्रार कांदे यांनी केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

ही चौकशी गंगापूर रोड पोलिसांकडून झाली असून त्याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार कांदे आणि निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेत वस्तुस्थिती सांगितली होती. मात्र, चौकशीदरम्यान, याबाबतच्या कॉल रेकॉर्डिंग्ज ते पोलिसांना सुपूर्द करणार होते मात्र असे कुठलेही पुरावे देण्यात त्यांनी असमर्थता दर्शविली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com