संजय राऊत यांच्या अटकेचे नाशकात पडसाद; शालीमार चौकात जोरदार निदर्शने

संजय राऊत यांच्या अटकेचे नाशकात पडसाद; शालीमार चौकात जोरदार निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना इडीकडून अटक करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये (nashik) संतप्त शिवसैनिकांकडून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलकांनी केंद्र आणि राज्यसरकारवर टीका करत आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला....(Shivsena Supporters agitation in nashik)

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना मध्यरात्री ईडीने अटक केली. यानंतर आज सकाळपासून मुंबईत शिवसैनिकांनी (Shivsena Mumbai) ठिकठिकाणी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी आंदोलन (Agitation) आणि निदर्शने झाल्यानंतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, वसंत गिते, विलास शिंदे, शोभा मगर, माजी आमदार योगेश घोलप, शिवाजी भोर, डी.जी. सूर्यवंशी, सचिन मराठे, माजी नगरसेवक अॅड. शामला दीक्षित, शितल भामरे, किरण दराडे, संजय भामरे, नाना पाटील, सुभाष गायधनी, बाळा दराडे यांच्यासह शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com