नाशिकरोड | हर्षाली गायकवाड

नाशिकरोड येथील देवी चौकातील शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शहरात विविध मंडळ, कार्यकर्ते आणि उत्साही तरुणांच्या सहभागाने शिवजन्मोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. विशिष्ट देखाव्या सोबत विद्युतरोषणाई करण्यात येत असून अधिक आकर्षक देखावे साकारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत...

याठिकाणी यंदा लाल किल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. लाल किल्ला पाहण्यासाठी सकाळ-सायंकाळ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळतें आहे. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाची नजर तिथे थांबल्याशिवाय राहत नाही.

शिवजयंतीच्या निमित्ताने येथील वातावरण आनंदाने निखळून निघाले आहे. जागोजागी झेंडे, बॅनर लावण्यात आले असून, नाशिकरोड उड्डाणपूल वरील छत्रपतींच्या नावाची रंगरंगोटी सुरु आहे.

यंदाची छत्रपती शिवाजी महाराज जयंती राज्य शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने करण्याची सूचना दिली तरी शिवप्रेमींचा उत्साह कणभरही कमी झालेली नाही.

शहरातील प्रमुख चौकांवर गड-किल्ल्यांचे देखावे व आकर्षक मंच उभारले जात असून अनेक रस्त्यांवर भगवे झेंडे, पताके आणि भगव्या रंगांची सजावट करण्यात आल्यामुळे शहर भगवेमय दिसत आहे.