पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक-शेगाव सायकल वारीचे प्रस्थान

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक-शेगाव सायकल वारीचे प्रस्थान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या २१ वर्षापासून महाराष्ट्रभर (Maharashtra) प्रसिद्ध असलेल्या नाशिक (Nashik) ते शेगाव (Shegaon) सायकल वारीचे (Cycle Rally) भांड न्यूज पेपर एजन्सी डीजीपीनगर क्रमांक 2 अंबड नाशिक येथून प्रस्थान झाले...

नाशिक ते शेगाव ४५० किलोमीटर अंतर रोज ११० किलोमीटर प्रमाणे चार दिवसात पूर्ण करणार आहे. मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगर, शेगाव ५ जानेवारी रोजी गजानन महाराजांचा (Gajanan Maharaj) जयजयकार करत सायकल वारी संत नगरी शेगावात पोहोचणार आहे.

गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेली ही सायकल वारी आता रौप्य महोत्सवाकडे (Silver Jubilee) वाटचाल करीत आहे. भक्तिमार्गातून पर्यावरण संवर्धन, पाणीबचत, अन्नाची नासाडी, बेटी बचाव, वृक्षसंपदा यासह सामाजिक विषयाचे प्रबोधन करत या वारीची वाटचाल सुरू असल्याचे सायकल वारीचे संस्थापक प्रल्हाद महाराज भांड यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाचा (Environmental Conservation) जागर करत पेट्रोल बचतीचा संदेश देत सायकल चालवण्याचे आरोग्याला किती महत्त्वाचे आहे हेच यातून साध्य होते. यंदा ७५ वारकऱ्यांचा समूह जात असून सर्व शासकीय नियमांचे पालन करत ही सायकल वारी शेगावात पोहोचणार आहे.

यावेळी आ. सिमा हिरे यांच्यासह सिडको प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, नगरसेविका प्रतिभा पाटील, नगरसेविका छाया देवांग, नगरसेवक दीपक दातीर, मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, प्रगतीशील शेतकरी बारकू दातीर आदी उपस्थित होते.

सायकल वारीत दिलीप देवांग, अविनाश दातीर ,विजय चौधरी, संजय जाधव, अनिल भवर, बाळकृष्ण वेताळ, प्रमोद बोरसे,अक्षय तगरे, राहुल ऊकाडे, भूषण सहाने, राजेंद्र भांड, गोकुळ शिंदे, नारायण सुतार, शरद सरनाईक, अरुण शिंदे, अनिल भावसार, आबासाहेब जाधव, मुकेश कानडे, सुधाकर सोनवणे, पांडुरंग पाटील, राकेश धामणे, राजेंद्र खानकरी, महेश थेटे, मिलिंद आहेर, दहिभाते आदींसह ७५ जण सहभागी आहेत.

यावर्षीच्या सायकल वारीत वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सायकलला पुढे व मागे वेगवेगळ्या सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्या लावल्या आहेत. जसे 'सर्व धर्माची एकच शिकवण पर्यावरणाचे करूया रक्षण', 'अंगणी लावा तुळस प्राणवायूचा होईल कळस, बेटी बचाव बेटी पढाव, कॅरी बॅगचा मोह टाळा कापडी पिशवी वापरा, जय जवान जय किसान, यांसह विविध संदेशाच्या पाट्या लावले आहेत.ही सायकल वारी राज्यभरात सायकल वारीचं वेगळेपण टिकून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com