पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक राज्यात दुसरा

पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक राज्यात दुसरा

नाशिक | प्रतिनिधी

मागील वर्षी १ जून २० पासून देशात पीएम स्वनिधी योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नाशिक महापालिकेला १७८४० चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने २४४२९ (१४०%) पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाईन अर्ज केलेले आहे. बँकांनी १२६७२ (७१%) पथविक्रेत्यांचे रक्कम रुपये १२ कोटी ६५ लाख रुपयेचे कर्ज मंजूर केलेले आहे व त्यापैकी ९६९७ (५४%) पथविक्रेत्यांना रक्कम रुपये ९ कोटी ६४ लाख रुपयेचे कर्ज आतापर्यंत वितरण केलेले आहे. पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरणात करण्यात नाशिक महाराष्ट्रात दुस-या क्रमांकावर आहे...

पीएम स्वनिधी योजने अंतर्गत ज्या पथविक्रेत्यांना बँकेकडून कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. त्यापैकी ४०% पथविक्रेत्यांनी कर्जाचे हाप्ते वेळेवर भरलेले नाही.

त्यामुळे अशा पथविक्रेत्यांचे CIBIL (पत) खराब होऊन त्यांना बँकेकडून यापुढे कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही व पीएम स्वनिधी अंतर्गत वाढीव कर्ज मिळण्यास पात्र होणार नाहीत, मात्र ज्या पथविक्रेत्यांचे हप्ते थकलेले आहे.

असे सर्व हप्ते किंवा कर्जाची सर्व रक्कम एकत्रित भरून पीएम स्वनिधी योजनेतील वाढीव २० हजार रुपयेचे कर्जासाठी पात्र होतील व त्यांचा CIBIL अहवाल समाधानकारक होईल.

तसेच पथविक्रेत्यांनी डिजीटल आर्थिक व्यवहार केल्यास १२०० रुपया पर्यंत कॅंशबँक मिळेल. याबाबतची जनजागृती पथविक्रेता संघटना आणि बँकांनी करावी, व पीएम स्वनिधी योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेल्या व आता पर्यंत बँकेकडून कर्ज प्राप्त न झालेल्या सर्व पथविक्रेत्यांसाठी बँकामार्फत 'पथविक्रेता दिवस' साजरा करण्यात येत आहे.

या दिवशी जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना कर्ज प्राप्त होईल. पीएम स्वनिधी योजनेबाबत अधिक माहितीसाठी नाशिक मनपा विभागीय कार्यालय किंवा बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com