शाळा सुरु करण्यावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब

शाळा सुरु करण्यावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब

नाशिक | Nashik

राज्य शासनाच्या निर्देशांनंतर महापालिका हद्दीतील शाळा (NMC area school) सुरू करण्यासाठी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षांविषयक उपाययोजनांसंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas jadhav) यांनी परिपत्रक जारी केले असून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण (vaccination करण्याचे बंधन घालण्यात आले आहे....

या उपाययोजनांसह सज्ज राहण्याच्या सूचना सर्व शाळांना या परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय ९ डिसेंबरला घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (NMC Education officer Sunita Dhangar) यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी व शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र कोरोनामुळे गेल्या २० महिन्यांपासून नाशिक शहरातील पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत.

१ डिसेंबरपासून हे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने (State Government) घेतला; परंतू शाळा सुरू होण्यापूर्वीच कोरोना विषाणूच्या 'ओमायक्रॉन' (Omicron) या नव्या व्हेरियंटने जगभरात दहशत पसरविल्याने नाशिक महापालिका आयुक्तांनी (Nashik Municipal commissioner) सावधगिरीची भूमिका घेत १ डिसेंबरऐवजी दहा डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांनी देखील आपला निर्णय पुढे ढकलला आहे.

Related Stories

No stories found.