चांदोरीत बनावट मद्यसाठा जप्त; १२ संशयितांना बेड्या

एक कोटींचा मुद्देमाल ताब्यात
चांदोरीत बनावट मद्यसाठा जप्त; १२ संशयितांना बेड्या

निफाड | प्रतिनिधी Niphad

गोदावरी तीरावर (Godavari River) वसलेल्या तालुक्यातील चांदोरी (Chandori) गावात धक्कादायक घटना मध्यरात्री उघडकीस आली आहे. बनावट मद्य बनवण्यासाठी चक्क लग्नसमारंभासाठी दिले जाणाऱ्या लॉन्सचाच वापर करण्यात आल्याचे मंगल कार्यालय मालकांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी १२ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत...

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील (Nashik Aurangabad state highway) सायखेडा पोलीस स्टेशन (Saykheda Police station) हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी (Chandori) येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयराज लॉन्स आहे. यावर अवैध देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला. यावेळी संजय मल्हारी दाते (वय 47, रा. गोंदेगाव ता. निफाड) हा तिथे मिळून आला.

येथून बनावट देशी दारुचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटर चे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते 10 हजार, देशी दारु बनवण्याचे साहित्य 5 पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

चांदोरीत बनावट मद्यसाठा जप्त; १२ संशयितांना बेड्या
Video Story : चांदोरीतील बहुचर्चित छाप्याची हकीकत ऐका खुद्द पोलीस अधीक्षकांच्याच तोंडून...

याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Related Stories

No stories found.