'या' तारखेला होणार 'नाशिक रन'

'या' तारखेला होणार 'नाशिक रन'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येत्या १८ फेब्रुवारीला महात्मा नगर क्रिकेट मैदानावर नाशिक रनचे (Nashik Run) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कोविड (corona) काळात केवळ मोजक्या सभासदांच्या उपस्थितीत नाशिक रन (nashik run) चा उपक्रम राबविला गेला होता मात्र यंदा करोनाचे सावट संपल्याने यापुर्वीसारखा नाशिक रन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा हा "रन फॉर फन" ("Run for Fun") सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. मोठ्यांसाठी 4.5 किलोमीटर मार्ग व लहानांसाठी 2.5 किलोमीटर असा असणार आहे. या रनची सुरुवात महात्मा नगर मैदानापासून होऊन जेहान सर्कल व परत महात्मा नगर मैदान असा असेल.

नाशिक रन करीताची नोंदणी फी लहान मुलासाठी ३०० रुपये प्रत्येकी तर मोठ्यांसाठी ३५० रुपये प्रत्येकी इतकी आहे. प्रत्येक नोंदणी धारकास 'नाशिक रन 2023' (Nashik Run 2023) चा टी-शर्ट (T-shirt) मोफत देण्यात येईल. या रन मध्ये भाग घेणाऱ्यास नाशिक रनचा टी-शर्ट परिधान करणे आवश्यक असणार आहे. नाशिक रन 2023 करिता नोंदणीसाठी नोंदणी स्टॉल सोमवार (दि.13) पासून महात्मा नगर मैदान येथे सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सुरु करण्यात आली आहे.

नाशिक मधील नामवंत वेगवेगळ्या प्रायोजकाद्वारे सहभागी होणाऱ्या नागरिकासाठी लकी ड्रॉ बक्षीसाची आयोजन करण्यात आलेले आहे. रन संपल्यानंतर या लकी ड्रॉ ची सोडत जाहीर करण्यात येईल. जे नागरिक मैदानावर हजर असतील तेच बक्षीस पात्र असतील. नाशिक रन च्या विश्वस्तांमार्फत सर्व नाशिककरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com