नाशिककर ! उद्यापासून बाजारात जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!
USER

नाशिककर ! उद्यापासून बाजारात जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

तासाभरात बाहेर पडा अन्यथा दंड

नाशिक । Nashik

बाजारपेठेतील गर्दी (Crowd At market) टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने (Nashik Mahapalika) विभागीय स्थरावरून पासेस वितरणाला (Market Pass) सुरूवात केली आहे. बॅरकेडींग (Barricading) करण्यात येणार्‍या विविध ठिकाणांवरील गर्दी नियंत्रणाचे काम सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडे बॅरकेडींगची व्यवस्था असून, अनेक ठिकाणी त्याची सज्जता झालेली आहे.

नाशिककर ! उद्यापासून बाजारात जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर (Corona Third wave) प्रशासनाने निर्बंध लागू केले असून, गर्दी नियंत्रणासाठी दुसर्‍या लाटेत (corona Second wave) वापरण्यात आलेल्या उपाययोजना पुन्हा कार्यन्वित करण्यात येत आहेत. त्यातील बाजारपेठेत प्रवेश घेणार्‍या ग्राहकांना पासेस देण्याचा. पोलिस आयुक्त दीपक पांडे ( Police commissioner Dipak Pandey) यांनी सुरू केलेला उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

बाजारपेठेत एक तासापेक्षा अधिक काळ घालवणार्‍या ग्राहकांकडून दंड वसूल (Collection of fines from customers0 करण्यात येणार आहे. आता पुन्हा पासेस यंत्रणा कार्यन्वित (Passes system implemented) झाली आहे. पासेस वितरणाचे काम महापालिकेकडे देण्यात आलेले असून, विभागीय कार्यालयामार्फत गर्दी होणार्‍या मेनरोड (Mainroad), भद्रकाली (Bhadrakali), एमजीरोड (MG Road) आदींसह शहरातील इतर भागात व्यापार्‍यांना पासेसचे वितरण करण्यात येते आहे.

यात व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचार्‍यांची नोंद (Workers Registration) करण्यात येत असून, पासेस असलेल्या व्यक्तींना बाजारपेठ सुरू असेपर्यंत थांबण्याची परवानगी राहणार आहे. ग्राहकांना मात्र दिलेल्या एका तासाच्या मुदतीत बाहेर पडावे लागणार असून, नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पोलिसांनी सांगितले की, पोलीस यंत्रणेची सज्जता झाली असून पासेसचे वितरण पूर्ण झाल्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पासेस वितरणाचे काम सुरू असून, सोमवारपासून पास घेऊन प्रवेश दिले जाणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com