<p>नाशिक | Nashik </p><p>केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात दुसर्या टप्प्यात निवड झाली. त्यात राज्यातील कोण-कोणती शहरे आहेत. ते पाहू</p> .<p>नाशिक शहराची देशातील निवड झालेल्या स्मार्ट सिटींच्या जाहीर झालेल्या रॅकींगमध्ये पंधरा क्रमांक आला आहे. तर यात नाशिक शहर हे राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे. केंद्र शासनाकडुन देशात निवड झालेल्या स्मार्ट सिटींच्या कामकाजासंदर्भातील माहिती घेतली जाते. यात या शहराने हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीची स्थिती, प्रकल्पांसाठी आलेला निधीं आणि प्रकल्पांसाठी निश्रीचा झालेल्या वापराची स्थिती यावरुन त्या त्या शहराला रॅकींग दिली जाते.</p><p>या रॅकींग मध्ये नाशिक शहर देशात पंधराव्या क्रमांकावर असुन राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात पहिल्या पाच शहरात अहमदाबाद, सुरत, इंदौर, आग्रा व कानपुर शहराचा समावेश आहे.</p>