गोदाकाठी अनेक वाहने पाण्याखाली; पाणीपातळीत वाढ

गोदाकाठी अनेक वाहने पाण्याखाली; पाणीपातळीत वाढ
Published on

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना आज खऱ्या अर्थाने वरुणराजाने दर्शन दिले. मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील पावसाचे पाणी गोदावरी नदीपर्यंत पोहोचले....

यामुळे दुपारपासूनच गोदावरी दुथडी भरून वाहताना दिसून आली. एकीकडे नदीतील पाणी वाढलेले असताना दुसरीकडे गोदाकाठी नागरिकांनी लावलेले वाहने मात्र पाण्यात गेले होते. स्मार्टसिटीने बसवलेल्या फरश्यांमुळे गोदापात्र काहीसे उंच झाले आहे. त्यामुळे आधीच उथळ असलेले गोदापात्र आणखीनच जास्त उथळ दिसून येत होते. त्यामुळे पाण्याची तीव्रता अधिक जाणवत होती.

होळकर पुलाखाली पाण्याचा वेगदरवर्षीप्रमाणे अधिक दिसून आला. अवघ्या ५० मिलीमीटर पावसात पुरासारखा प्रकोप गोदावरीचा बघायला मिळाल्यामुळे येणाऱ्या काळात पावसाची संततधार वाढल्यास आणखी नियोजनात्मक उपाययोजना करण्याची गरज याठिकाणी असणे आवश्यक आहे.

त्यामुळे प्रशासनाची खऱ्या अर्थाने आजच्या पावसामुळे रंगीत तालीम झाल्याचे चित्र एकूण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com