नाशिकच्या द्राक्षांना विशेष लिफाफ्याचे कोंदण

नाशिकच्या द्राक्षांना विशेष लिफाफ्याचे कोंदण

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकची ओळख असलेल्या द्राक्षे या फळाला भौगोलिक मानांकन (Geographical Indication ) मिळाल्यामुळे नाशिकचे उत्पादन असलेल्या द्राक्षे या फळाला ऐतिहासिक आणि पारंपारिक मुल्ये प्राप्त व्हावे, तसेच नाशिकचे द्राक्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी तसेच वारसा म्हणून जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने अनोख्या पद्धतीने 'नाशिक ग्रेप्स' विशेष पाकिटाचे अनावरण केले आहे....

नुकतेच नवी मुंबई रिजनच्या डाक निर्देशक यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक संजीव पडवळ, सुनिल वानखेडे, अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक, रवी बोराडे , अध्यक्ष नाशिक द्राक्ष बागायतदार संघ नाशिक, नितीन महाजन, वरिष्ठ जनरल मॅनेजर बीएसएनल नाशिक, मोहन अहिरराव, वरिष्ठ अधिक्षक नाशिक पोस्टल विभाग व नाशिक टपाल संग्राहक शांतीलाल हिरण,रवींद्र वामनाचार्य, अच्युत गुजराथी, पुरुषोत्तम भार्गवे, दीपक पटेल यांच्या उपस्थितीतीत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था संभाजी चौक नाशिक येथे संपन्न झाला.

भारतीय टपाल विभागाच्या विशेष टपाल लिफाफ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संग्राहकांच्या जगात विशेष महत्व आहे.

हे लिफाफे मोजक्याच संख्येने आणि एकदाच प्रकाशित केले जातात. त्यामुळे त्यांना विशेष मागणी असते. टपाल तिकिटे आणि पाकीटांचा संग्रह करणारे नागरिक आवर्जून विशेष पाकिटे खरेदी करतात, अशी माहिती नाशिक विभागाचे वरीष्ठ अधिक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.

यासाठी पोस्टल विभागातील अधिकारी विशाल निकम , संदीप पाटील, मनोज रुले व मनेष देवरे व नाशिक डाक विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com