नाशिक पोलिसांचे कार्यक्षेत्र वाढणार

नाशिक आयुक्तालयात 'या' तालुक्यांचा समावेश होणार
नाशिक पोलिसांचे कार्यक्षेत्र वाढणार
नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे

नाशिक । Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालयाचा (Nashik CP Office) विस्तार वाढविण्यासाठी पोलिस आयुक्तालयााने शासनाला प्रस्ताव पाठवीला आहे. शासनाची मंंजुरी मिळताच शहरालगतच्या तालुक्यापर्यंंत नाशिक पोलिसांचे (Nashik Police) कार्यक्षेत्र वाढणार आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालय स्थापन होऊन आता ३१ वर्ष झाली आहे. आयुक्तांंच्या पदाच्या दर्जाही विशेष पोलिस महानिरक्षकांपर्यंत (Special Inspector General of Police) वाढला आहे. मात्र हद्द ३० वर्षांपूर्वी होती तेवढीच आहे. नवीन पोलिस ठाणी, लोकसंंख्या, अधिकारी वाढले. त्या प्रमाणे आता कामही वाढवीले पाहीजे. म्हणुन नाशिक तालुका (Nashik Taluka), ओझर(Ozar), त्रंबंकेश्‍वर( Trimbakeshwer), सिन्नर (Sinnar) हे पोलिस ठाणे आयुक्लयातीत समाविष्ट करावे.

तसेच चुंचाळे (Chunchale) व विहीतगाव (Vihitgoan) ही नवी पोलिस ठाणीे निर्माण करावीत, असा प्रस्ताव गेल्या महीन्यातच गृह खात्याला (Home Minister) पाठवीला आहे. शासनाची मंजुरी मिळाली तर नाशिक आयुक्तालयाचे नाव त्रंंबकेश्‍वर, सिन्नर, निफाड तालुक्यापर्यंत झळकणार आहे.

नाशिक महापालीकेची (Nashik NMC) हद्द जरी ठराविक असली तरी आयुक्तालयात समाविष्ट झाल्याने त्र्यंबक, ओझर, सिन्नर व नाशिक तालुक्यातील नागरिकांना आपण नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत असल्याचे समाधान मिळणार आहे. त्याच बरोबर आयुक्तांंच्या पदाचा दर्जाही आपोआप अप्पर महासंंचालकांचा होईल.

ज्या तालुक्यात एक पोलिस अधीक्षक दर्जाचे अधीकारी लक्ष ठेवत त्या तालुक्यात अर्धा डझन पोलिस अधीक्षक सातत्याने भेटी देतील. गुन्हेगांरीवर प्रभावी नियंंत्रण येण्यास मदत होईल. ग्रामीण पोलिसांंवरील तानही या निमीत्ताने कमी होईल. त्यांना मालेगाव सारख्या संवेदनशील शहरावर लक्ष्य ठेवणे सोयीचे होणार आहे.

एकीकडे नाशिकची हद्द वाढवत असतांना दुसरीकडे मालेगाव पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव गेले दहा वर्ष धुळ खात पडला आहे. तो आता तरी मंजुर होईल का? असा प्रश्‍न या निमीत्तने उपस्थित होत आहे.मालेगाव जिल्हा करावा व आयुक्तलय स्थापन करावे ही मालेगावकरांची जुनी मागणी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com