नाशकात हेल्मेटसक्ती आणखी कडक; विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला द्यावी लागणार परीक्षा

परीक्षा पास झालात तरच मिळणार वाहन; पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडून चौथा अध्याय
नाशकात हेल्मेटसक्ती आणखी कडक; विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला द्यावी लागणार परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात हेल्मेटसक्ती (Compulsory Helmet) अधिकाधिक तीव्र केली जात आहे. पुढच्या टप्प्यात विनाहेल्मेट धारकाचे समुपदेशन तर होणारच शिवाय त्यास परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षा पास होईपर्यंत दुचाकीस्वाराला वाहनदेखील मिळणार नाहीये.... (two hours exam for without helmet bike riders)

याबाबतचा नवा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak pandey) यांनी काढला आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत शहरात हेल्मेटसक्तीबाबत मोहीम राबविण्यात येत असून त्या मोहिमेचा हा चौथा अध्याय असल्याचे बोलले जात आहे.

शहरात १५ ऑगस्टपासून 'नो हेल्मेट नो पेट्रोल' (no helmet no petrol) ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून जे पेट्रोलपंप धारक सहकार्य करत नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

त्यानंतर शहरात वाहतूक विभागाने हेल्मेट न वापरणाऱ्यांचे समुपदेशन (counselling for without helmet bike riders) करायला सुरुवात केली असुन आतापर्यंत ५ हजारच्या वर विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

दरम्यान, भाऊबीजेपासून नो हेल्मेट नो कोऑपरेशन (सहकार्य) (No helmet no coopration) ही मोहीम सुरू करण्यात येऊन शहरातील महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था, शाळा आदी ठिकाणी विना हेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेश मिळणार नसून त्यांना सहकार्य केले जाणार नाही.

याबाबत प्रत्येक संबंधित संस्थांनी कोणत्याही एका अधिकाऱ्याला मालमत्ता प्राधिकारी नेमण्याबाबत पोलीस आयुक्तालयाने निर्देश दिले होते.

त्याची अमलबजावणी सुरु होत आहे. त्यानंतर आता समुपदेशन झाल्यानंतर एक परीक्षा देऊन किमान ५०% मार्क मिळविणे अनिवार्य असणार आहे.

परीक्षा पास झाल्यानंतर संबंधित दुचाकीस्वाराला आपले वाहन मिळणार आहे. जर नापास झाला तर पुन्हा परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com