
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
शहरात दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत दुचाकी घेऊन फिरणाऱ्या तिघांवर दुचाकी जप्तीची कारवाई करत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्या ऍडलॅब कडून उत्तम नगरकडे जाणाऱ्या प्रसाद सुनील हळदे (२४,रा.फ्लॅट नं.१,पुष्पलता अपार्टमेंट विसे चौक,गंगापूर रोड, नाशिक) याच्याकडे असलेल्या बुलेटच्या (एमएच १५,जी क्यू १२४२ ) सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्याने आवाज करणारे सायलेन्सर बसवून भरधाव वेगाने फिरतांना दिसून आल्याने पोलीस शिपाई मुकेश शिवाजी गांगुर्डे (३४) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या प्रकारात पवन नगरकडून उत्तम नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऋषिकेश सुभाष खटकाळे (१८, रा. जाधव संकुल अंबड) याच्या देखील बुलेटचे (एम एच १५ एफ आर ००१६ ) सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्याने आवाज करणारे सायलेन्सर बसवून भरधाव वेगाने फिरतांना दिसून आल्याने पोलीस शिपाई मुकेश शिवाजी गांगुर्डे (३४ )यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
तर तिसऱ्या प्रकारात देवाराम घेवाराम बिष्णोई (रा.भाबा नगर,मुंबई नाका,नाशिक) हा पवन नगर पाण्याच्या टाकीसामोरून बुलेट (एम एच ४७,पी २६९१ ) सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्याने आवाज करणारे सायलेन्सर बसवून भरधाव वेगाने फिरतांना दिसून आल्याने पोलीस अंमलदार उल्हास देविसाद गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.