नाशिक पोलीसांनी घेतले मनावर, दिवसभर कारवाई

विनाकारण फिरणारांची जागेवरच चाचणी
नाशिक पोलीसांनी घेतले मनावर, दिवसभर कारवाई

नाशिक । Nashik

शहरात कोरोनाचा वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अखेर पोलीस प्रशासनाने राज्यशासनाने घोषीत केलेल्या संचार बंदीच्या अंमलबजावणीस सुरूवात केली आहे. आज दिवसभर शहरातील विविध रस्त्यांवर तपासणी तसेच कारवाई सुरू होती. तर विनाकारण फिरणारांची जागेवरच कोरोना चाचणी घेण्याचा धडाका पोलीसांनी लावल्याने विनाकारण फिरणारांची भंबेरी उडाल्याचे चित्र होते.

जिल्हा तसेच राज्यभरात कोरानाचा वाढता उद्रेक पाहता राज्य शासनाने 15 दिवसांच्या संचार बंदीची घोषणा केली आहे. मात्र शहर तसेच जिल्ह्यात पोलीस केवळ रात्रीच कारवाई करत असल्याने गेली दोन दिवस सर्वत्र नागरीकांचा मुक्त संचार होता. त्यांना ना कोणी आडवते ना होते विचारपूर यामुळे ही संचार बदीं की मुक्त संचार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान विविध स्थरातून टिका झाल्यानंतर शहर पोलीसांनी कारवाईचे मनावर घेतले असून शुक्रवारी रात्री पासून शहरभर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहनांच्या तपासण्यांबरोबरच विनाकारण फिरणार्‍या तरूणांची चौकशी करून त्यांच्या तातडीने जागीच कोरोना चाचण्या केल्या जात आहे. परिणामी अशा युवकांची धावपळ उडाल्याचे चित्र आहे. शहरात येणार्‍या सर्व मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत अशा विविध 28 ठिकाणी बॅरेकेंडींग करण्यात आले आहे. यासह शहरातील भाजीपाला मार्केट, बाजारपेठा, वाहतुक तसेच शहरातील गर्दी होणार्‍या प्रमुख ठिकाणांवर चेकपाँईंट तयार करण्यात आले आहेत. यासह त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत नागरीकांना ध्वनीक्षेपाद्वारे सातत्याने आवाहन करण्यात येत असून विनाकारण फिरताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. मात्र पोलीसांचे इशारे व गस्ती पथके केवळ रात्री कार्यरत असल्याचे चित्र होतेे. सायंकाळी 7 वाजता पोलीस सर्व बाजार पेठांत दाखल होऊन सर्वांना जबरदस्तीने सर्व बंद करण्यास भाग पाडत आहेत. मात्र दिवसभर नागरीकांना कुठलाही अटकाव न झाल्याने कोरोना अटकाव कसा करणार असा प्रश्न उपस्थित होत होता.

अखेर शुक्रवारी रात्री पासून पोलीसांनी कडक कारवाई सुरू केली असून मुंबईनाका पोलीसांनी 47 जणांची , गंगागपूर पोलीांनी 28, सातपूर 18, उपनगरला20 जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. पैकी 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर मुंबईनाका पोलीसांनी आज दिवसभरात 62 जणांवर दंडात्मक कारकवाई केली. सायंकाळी 7 नंतर कारवाई अधिक कडक करण्यात आली होती. या दरम्यान चारचाकी वाहनांचीही तपासणी करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com