३६५ दिवसांनंतर नाशिक पोलिसांचे 'मिशन ऑल आऊट'; तीस सराईतांची धरपकड
file photo

३६५ दिवसांनंतर नाशिक पोलिसांचे 'मिशन ऑल आऊट'; तीस सराईतांची धरपकड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली आहे. तब्बल वर्षभराच्या विलंबानंतर पोलिसांनी मिशन ‘ऑल आऊट’ राबवत विविध गुन्ह्यांतील ३० गुन्हेगारांची धरपकड केली आहे....

या कारवाईत १० शस्त्रास्त्रे जप्त करत ३६ अवैध धंद्यावर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात भरदिवसा घरफोडी, चोरी, जबरी चोरीसोबतच भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार केले जात आहेत.

हाणामारी, प्राणघातक हल्ले नित्याचे झाले असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचे चित्र आहे. गुन्हे वाढत असताना गुन्हेगारांची धरपकड होत नसल्याने सराईत गुन्हेगारांकडून गुन्हे होण्याची शक्यताही वाढली आहे.

दरम्यान, अचानक रात्रीच्या वेळी शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ११२ पोलिस अधिकारी व ७८६ अंमलदारांचा ताफा शहरातील रस्त्यांवर उतरला. ठिकठिकाणी नाकाबंदी, गुन्हेगारांची शोधमोहिम राबवण्यात आली.

शहरातील अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर अवैध मद्यसाठा वाहतूक, विक्री व साठा केल्याप्रकरणी २६ ठिकाणी कारवाई झाली तर अवैध जुगार प्रकरणी ७ व गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विरोधात तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com