'राज' इशाऱ्यानंतर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर

'राज' इशाऱ्यानंतर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेत त्यांनी भोंग्याबाबत पुन्हा इशारा दिला. दि. ३ मे पर्यंत भोंगे (Loudspeaker) उतरवा अन्यथा ४ तारखेपासून ऐकणार नाही. ४ मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावू असे ते म्हणाले होते....

'राज' इशाऱ्यानंतर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर
जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी जमिनींचे लिलाव

याच पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनसे कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मनसे कार्यालयाच्या जवळच ईदगाह मैदान (Idgah Maidan) असल्याने कार्यालयाच्या आवारात कडक पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'राज' इशाऱ्यानंतर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर
...जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात

आज ईदच्या पार्श्वभूमीवर श्वानपथक, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेचे पोलीस यांच्यासह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naikanvare) यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com